सुबोध भावे म्हणतोय, मी बायकोला घाबरतो!

'शुभ लग्न सावधान' या चित्रपटाचा नुकताच टीझर लाँच झाला आहे. विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या टीझरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाततल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय? हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असून हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Shubh Lagn Savadhan :Subodh bhave is afraid of his wife
'शुभ लग्न सावधान' या चित्रपटाचा टीझर लॉंज

‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाचा नुकताच टीझर लाँच झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर सुबोध भावे आणि श्रुती मराठे पुन्हा एकदा ‘शुभ लग्न सावधान’ चित्रपटामध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. श्री पार्टनर नंतर दिग्दर्शित समीर सुर्वे यांचा ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात बायकोला घाबरणाऱ्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाचा सोशल मीडिया साईटवर टीझर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

चित्रपटातील कलाकार

‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये हे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी निर्मिती केली आहे.

असा आहे चित्रपट

एकंदरीत हा चित्रपट लग्न आणि त्याच्याशी निगडीत आधारित विषयांवर आहे. तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या टीझरमधून प्रेक्षकांना दिसून येत आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून हा अस्सल कौटुंबिक चित्रपट असून, त्याचे चित्रीकरण दुबई आणि इगतपुरी येथील नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्याबरोबरच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी असलेल्या, ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

सुबोध आणि श्रुती दुसऱ्यांदा एकत्र

‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांनी एकत्र स्क्रिनवर काम केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शुभ लग्न सावधानमध्ये या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जतीन वागळे यांनी केले होते. तर या चित्रपटात महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.