घरमनोरंजनशुभांगी सदावर्ते साकारणार ‘नवे लक्ष्य’ मालिकेत पीआयची भूमिका

शुभांगी सदावर्ते साकारणार ‘नवे लक्ष्य’ मालिकेत पीआयची भूमिका

Subscribe

संगीत देवबाभळी या नाटकाद्वारे शुभांगी घराघरात पोहोचली आहे.

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर,अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पीआय मोक्षदा मनोहर मोहिते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. संगीत देवबाभळी या नाटकाद्वारे शुभांगी घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतील मोक्षदा या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा तिला आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना शुभांगी म्हणाली, ‘मोक्षदा मोहिते’ असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ती प्रत्येक प्रसंगांचा, घटनेचा आणि गुन्ह्यांचा सगळ्या बाजूने विचार करते आणि मगच तिचं मत मांडते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये तिची दहशत आहे. वर्दीची खरी किंमत जेव्हा ती शूटिंगच्या निमित्ताने आम्ही धारण करतो तेव्हा कळते. पोलिसांच्या मेहनतीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. नवे लक्ष्यच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

- Advertisement -

खऱ्या आयुष्यातही जर अन्यायाचा प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते. अगदी आठ दिवसांपूर्वीचाच प्रसंग सांगायचा तर शूटिंग संपवून उशिरा मी घरी येण्यासाठी रिक्षा बुक केली. त्या रिक्षावाल्याने मला जवळपास एक तास चुकीच्या दिशेने फिरवलं. मी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी रौद्ररुप धारण केलं आणि त्याला पैसेच दिले नाहीत. त्या रिक्षावाल्यासाठी हा कायम स्मरणात राहाणारा धडा असेल. अश्या परिस्थितीत घाबरुन न जाता धैर्याने सामना करायला हवा असं मला वाटतं. मोक्षदा ही व्यक्तिरेखा मनाला खूपच भावणारी अशी आहे. पोलिसांविषयी माझ्या मनात आदर होताच ही मालिका करताना हा आदर आणखी वाढला आहे. वर्दीची खरी किंमत जेव्हा ती शूटिंगच्या निमित्ताने आम्ही धारण करतो तेव्हा कळते. पोलिसांच्या मेहनतीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. नवे लक्ष्यच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद होत आहे.

 

- Advertisement -

महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी ही मालिका ‘नवे लक्ष्य’ ७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने जुहू चौपाटी येथे भव्यदिव्य वाळुशिल्प साकारून स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला होता.


हेही वाचा – गॅंगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -