वीरता आणि पराक्रमाची यशोगाथा सांगणारा ‘शूरवीर’ लवकरच होणार प्रदर्शित!

जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित असून ही मालिका विशेष रूपाने डिज्नी+ हॉटस्टारवर १५ जुलैला येत आहे

शत्रू आपल्या घरात घुसला आहे पण काय त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे शूरवीर तयार आहेत? डिज़्नी+ हॉटस्टार तुमच्यासाठी अॅक्शन पॅक्ड मिलिटरी ड्रामा सिरीज शूरवीर घेऊन येत आहे. अलीकडेच त्याच्या नेत्रदीपक ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. शूरवीरमध्ये भारतातील एलिट टास्क फोर्स, ज्यामध्ये देशावर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तीनही संरक्षक दलांचा समावेश असलेली, एक सुसज्ज तुकडी बनवण्यासाठीच्या रोमहर्षक प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित असून ही मालिका विशेष रूपाने डिज्नी+ हॉटस्टारवर १५ जुलैला येत आहे.

अभिनेता मकरंद देशपांडे, मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार देशविघातक चोरट्या कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई लढाई आणि बुद्धिमान योजना आदींवरील कथा सादर करण्यासाठी एकत्र आले असून महत्त्वाचे म्हणजे ही कथा आपल्याला या अभिजात सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते.

अभिनेता मनीष चौधरी म्हणाले कि, “शूरवीर हे एक याआधी कधीही सादर झाले नसेल असे लष्करी नाट्य आहे. आपल्या सैन्याला देशावर येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी व्यापक प्रशिक्षण देण्याचा हा भाग आहे. ही भूमिका साकारणे हा माझ्यासाठी एक जबरदस्त अनुभव होता. ही व्यक्तिरेखा जगण्याचा प्रवास माझ्यासाठी वैयक्तिकरित्या प्रेरणादायी आहे. डिज्नी+ हॉटस्टारवर शो रिलीज झाल्यावर प्रेक्षक यावर कशी प्रतिक्रिया यासाठी मी खूप उत्सुक आहे.”