टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी 2019 मध्ये तिचा दुसरा पती अभिनव कोहलीपासून विभक्त झाली होती. मात्र यानंतर दोघांमध्येही घरगुती कलह वाढताना दिसत आहेत. गेल्या ३ वर्षापासून अभिनव आणि श्वेता यांच्यात त्यांच्या मुलांच्या कस्टजीवरुन वाद सुरु आहेत. अभिनव हा सोशल मीडियावर वारंवर व्हिडिओ शेअर करत, श्वेता त्याला त्याच्या मुलगा रेयांशपासून दूर ठेवत आहे असा आरोप करत असतो. श्वेता आता ‘खतरों के खिलाडी ११’ च्या सीझनसाठी दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊनला शहरात रवाना झाली आहे. अशा परिस्थितीत आता श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीने आपल्या मुलाबद्दल आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनव असे म्हणाला आहे की, श्वेताने अवघ्या ४ वर्षाच्या मुलाला, रेयांशला मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीत सोडले आणि ती शूटींगसाठी केपटाऊनला रवाना झाली. सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अशा परिस्थितीत कोणीही आपल्या मुलाला एका खोलीत सोडून कसे जाऊ शकेल? अभिनवने तीन सलग तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यात तो असे म्हणतो की, मुलाच्या सुरक्षेसाठी त्याने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क केला आहे.
View this post on Instagram
जेव्हा तिने मला तिच्या निघण्याविषयी विचारले तेव्हा, कोरोनाच्या परिस्थिती पाहता मी तिला नकार दिला. ती तेथे 12 तास काम करेल. मी म्हणालो की, मुलाला हॉटेलमध्ये सोडण्याची गरज नाही, मी त्याची काळजी घेईन. पण ती आता दक्षिण आफ्रिकेत शूटिंगसाठी गेली आहे, पण माझं मूल कुठे आहे? मी पोलीस स्टेशनला गेलो, पण त्यांनी मला ईमेल करायला सांगितले, बाल कल्याणाकडे जायला सांगितले आहे.” दुसर्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “माझ्या मुलाला चिंताग्रस्त समस्या आहेत. जर त्याच्या आसपास त्याचे आईवडील नसतील तर तो असुरक्षित वाटतो. श्वेता निघून गेली आहे या गंभीर काळात तो एकटाच होता.
View this post on Instagram
“अभिनवने या व्हिडीओमध्ये पुढे सांगितले की, तो आपल्या मुलाचा फोटो घेऊन प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आहे. पण मुलगा कुठे आहे, हे माहित नाही. त्याला पोलिसांकडून कोणतीही अपेक्षा उरली नाहीय, असे तो म्हणाला. त्याने चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर पण कॉल केला. त्यांनी मदतीसाठी विचारणा केली, पण कोणतीही मदत मिळाली नाही. अभिनवने आपल्या मुलासाठी अनेक हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाहीय.
हे वाचा- गोव्यातून दमण, सिल्वासाकडे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांच्या हालचाली सुरु……