Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन श्वेता तिवारीच्या लेकीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

श्वेता तिवारीच्या लेकीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड स्टारकिड त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत येत असतात. यात छोट्या पडद्यावरील कलाकारांची मुलंही मागे राहिली नाही आहे. ‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारीची लेक पलक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ या सिनेमातून पलक बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नुकतेच टिझर लॉन्च करण्यात आले आहे. विशाल रंजन मिश्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून एक भयपट प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

पलकने ‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले. चित्रपटाच्या निर्मात्यांच्या म्हण्याप्रमाणे या भूमिकेसाठी देशभरातील हजारों मुलींनी ऑडिशन्स दिल्या होत्या. पण त्यातून पलक हीची निवड करण्यात आली. पलकसोबत अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मल्लिका शेरावतदेखील या बहुप्रतिक्षित हॉरर चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले. टीझर पाहता त्यात जास्त पात्रं उघडकीस येत नसली तरी चित्रपटाचा सूर अंधकारमय आणि भुताटकीच्या जगात प्रेक्षकांना घेऊन जातो. वास्तविक जीवनावर आधारित प्रसंगातून हा चित्रपट सध्या अंतिम टप्प्यात आला असून लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.


हे वाचा- अश्लाघ्य शब्दात कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला शशांकने खडसावले!

- Advertisement -