अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

या चित्रपटातली गीतांना जेष्ठ संगीतकार अशोक पत्की संगीत साज चढवणार आहेत. अशोक पत्की यांचं संगीत असलेली गाणी गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी एक विशेष पर्वणीच असते.

‘श्यामची आई’ (shyamachi aai) उल्लेख केला कि सर्वप्रथम आठवण होते ती साने गुरुजी यांची. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ आपल्या लेखणीतून अजरामर केली आहे. साने गुरुजींची(sane guruji0 अनेक गाणी अशी आहेत जी आजही सर्वांच्या मनात रुंजी घालतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांच्याही मनात ‘श्यामची आई’ या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. सह्दयाच्या रंगीबेरंगी युगात ब्लॅक अँड व्हाईटच्या काळात घेऊन जाणारा ‘श्यामची आई’ हा चित्रपट पुन्हा एकदा साकार होतोय. या चित्रपटातली गीतांना जेष्ठ संगीतकार अशोक पत्की संगीत साज चढवणार आहेत. अशोक पत्की(ashok patki) यांचं संगीत असलेली गाणी गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी एक विशेष पर्वणीच असते.

आणखी वाचा – सलमान खानची दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री, चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’चा पहिला लूक रिलीज

आणखी वाचा –  ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

 

‘श्यामची आई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय डहाके करत आहेत, तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अमृता अरुण राव सांभाळणार आहेत. ‘श्यामची आई’ चित्रपटचं पाहिलं शेड्युल कोकणात पार पडलं आणि त्यानंतर दुसरं आणि महत्वाचं शेड्युल पन्हाळयामध्ये पूर्ण करण्यात आलं. एकीकडे चित्रपटचं शूटिंग होत असताना दुसरेकडे अशोक पत्की यांच्या सारखे जेष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार या चित्रपटाची सांगीतिक बाजू बळकट करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची गाणी अधिक श्रवणीय होणार आहेत हे निश्चित. अशोक पंक्ती यांनी आजवर अनेक गाण्यांना सुमधुर चाल दिल्या आहेत. अनेक मालिकांची शीर्षक गीते सुद्धा अशोक पत्कींनी आपल्या संगीताने संस्मरणीय केली आहेत. जिंगल्सचे बादशहा अशी अशोक पत्की यांची सिने सृष्टीमध्ये ओळख आहे. सिनेमा आणि मालिकांसोबतच अशोक पत्की यांनी नाटकांनाही संगीत दिले आहे. ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निमित्तने अशोक पत्की यांच्यावर या चित्रपटाच्या संगीताची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असणार आहेत. याचित्रपटातील गाण्यांना संगीत जरी अशोक पत्की देणार असले तरी ही गाणी कोणते गायक किंवा गायिका गाणार आहेत ते मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

आणखी वाचा – समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा

 

मराठी चित्रपट सुटीतील ‘माईलस्टोन’ चित्रपट ‘श्यामची आई’

आणखी वाचा – प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

साने गुरुजींच्या विचारांचे द्योतक असणारा ‘श्यामची आई’ हा सिनेमा प्रत्येकाच्याच कायम लक्षात राहणार सिनेमा आहे. आणि याच चित्रपटाची भाव ओळखून ते प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवून त्याला योग्य न्याय देणं हे महत्वाचं आहे. ‘श्यामची आई’ सारख्या राजाराम सिनेमा आणि त्यातील गाण्यांना न्याय देण्यासाठी अशोक पत्कींसारखे जेष्ठ आणि श्रेष्ठ संगीत दिग्दर्शक हवे असंही सुजय डहाके म्हणाले. त्याचबरोबर हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात प्रेक्षसकांसमोर येणार आहे आणि त्यामुळे या चितपटातील गाण्यांनाही तोच बाज लाभावा ह्या मुख्य कारणानेही ‘शयमची आई’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा अशोक पत्की यांच्या कडे सोपविण्यात आली असंही सुजय डहाके म्हणाले. दरम्यान या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.