ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या सिद्धांत कपूरला जामीन

डीसीपी भीमा शंकर यांनी सांगितले की, सिद्धांत कपूरसह ज्या ४ जणांना जामीन मंजूर झाला आहे, त्यांना जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांसमोर त्यांना हजर व्हावं लागेल

बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला रविवारी रात्री ड्रग्ज प्रकरणात बंगळूरू येथे अटक करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने ड्रग्ज घेतल्याची माहिती समोर आली होती शिवाय सिद्धांत कपूरसह इतर ६ जणांनी ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न झाले होते. आता या केसमधील ५ जणांना जामीन मिळालेला आहे.

सिद्धांत कपूरला मिळाला जामीन
डीसीपी भीमा शंकर यांनी सांगितले की, सिद्धांत कपूरसह ज्या ४ जणांना जामीन मंजूर झाला आहे, त्यांना जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांसमोर त्यांना हजर व्हावं लागेल. जामीन मिळालेल्या ५ जणांपैकी सिद्धांत कपूर, अखिल सोनी, हरजोत सिंह, हनी, अखिल हे सहभागी आहेत. बंगळूरू येथील एमजी रोड येथील हॉटेलमध्ये ही पार्टी चालू होती. त्यावेळी सिद्धांत कपूरही तिथे उपस्थित होता, पार्टीमध्ये डीजे चालू होता. पोलिसांना कोणीतरी हॉटेलच्या रूममध्ये ड्रग्ज पार्टी चालू असल्याची बातमी दिली होती. तेव्हा पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.

कचऱ्याच्या डब्यापाशी सापडले ड्रग्ज
पोलिसांनी हॉटेल स्टाफला सुद्धा अनेक प्रश्न विचारले. मात्र उपस्थित असलेल्या इतर लोकांजवळ त्यांना ड्रग्ज मिळाले नाहीत. परंतु कचऱ्याच्या डब्यापाशी त्यांना गांजा आणि MDMA हे ड्रग्ज पडलेले दिसले होते. आता पोलिस हॉटेलच्या सीसीटीवी फुटेजची तपासणी करणार आहेत. आतापर्यंत ड्रग्जचे दोन पॅकेट पोलिसांना मिळाले आहेत.

करिअर मिळालं होतं अपयश
सिद्धांत कपूर हा शक्ति कपूरचा मुलगा आहे. त्याने बॉलिवूडमध्ये करिअर करायला सुरूवात केली होती, मात्र त्याला आपल्या वडिलांप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे यश मिळालं नाही. सिद्धांत कपूरने बऱ्याच चित्रपटांमध्ये लहान-मोठ्ठ्या भूमिका सुद्धा साकारल्या आहेत. तसेच ‘भूल भुल्लैया’, ‘भाग-भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ या चित्रपटांमध्ये सिद्धांतने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून का काम केले आहे. सिद्धांत कपूरने ‘शूटआउट एट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात अनिल कपूर, कंगना रनौत, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. याशिवाय सिद्धांतने श्रद्धा कपूरसोबत ‘हसीना पार्कर’ या चित्रपटात दिसून आला होता.

 


हेही वाचा :संजय लीला भंसाळीच्या ‘हीरामंडी’मध्ये रेखा साकारणार मुख्य भूमिका