घरमनोरंजनबालपणींच्या आठवणींना उजाळा देत सिध्दार्थ झाला भावूक

बालपणींच्या आठवणींना उजाळा देत सिध्दार्थ झाला भावूक

Subscribe

सिद्धार्थने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो त्याने शेअर केला आहे.

स्वत:च्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा सिद्धार्थ जाधव हा कायमच चाहत्यांची मनं जिंकत आला आहे. मराठीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत ‘एनर्जेंटिक स्टार’ सिध्दार्थ चं नाव पाहायला मिळतं. विनोदी असो वा भावनिक कोणत्याही भूमिकेत आपल्या शैलीत सिध्दांर्थ नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करताना दिसतो. मात्र सिध्दार्थच्या या यशामागे एक मोठा संघर्ष आहे. सिध्दार्थच्या या प्रवासात अनेक अडथळे आले पण त्यांना पार करत त्यानं मराठी सिनेसृष्टीत स्वत:चे एक वेगळ स्थान निर्माण केलं. लोकप्रियतेची उंची गाठूनही सिध्दार्थ हा त्याचा साधेपण विसरलेला नाही. सिद्धार्थने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत असलेल्या एका चिमुकल्याला पाहून सिध्दार्थ त्याच्या भूतकाळात हरवला आहे. या फोटोखाली दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर फोटो.. मी आणि माझं ‘बालपण’..आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण.. बोललो काहीच नाही.. फक्त अनुभवलं .. एकमेकांना.. तेजस नेरुरकर मित्रा मी तुझा मनापासून आभारी आहे…आज माझ्या सिध्दूला तू मला भेटवलस…आई, पप्पा, दादा , पिंकी.. LOVE UUU… खुप…” असं भावनिक कॅप्शन या फोटोला सिध्दार्थ ने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

 या फोटोतून जणू काही त्याला बालपणीच्या सिध्दार्थची आठवण झाल्याचे दिसत आहे. सिध्दार्थ हा त्याच्या मेहनतीच्या जोरावर सुपरस्टार या पदापर्यंत पोहोचला आहे. कदाचित या लहान मुलाने त्याला याच संघर्षाची आठवण करुन दिल्याचा भास त्याला या भावनिक पोस्टमधून होत आहे. सिध्दार्थ हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून प्रेक्षकांचाही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

हे वाचा- Netflix : अकाउंट शेअर करणे अशक्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -