घरमनोरंजनसिद्धार्थने कियारासाठी खरेदी केलं 'इतक्या' कोटींचं घर

सिद्धार्थने कियारासाठी खरेदी केलं ‘इतक्या’ कोटींचं घर

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लग्नाची जोरदार तयारी केल्यानंतर अखेर आज (7 फेब्रुवारी) ही जोडी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न करतील. त्यांच्या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, आता लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थ नक्की कोणत्या घरामध्ये राहायला जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

सिद्धार्थने खरेदी केलं 70 कोटींचं घर

लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थ कुटु्ंबीयांपासून वेगळे राहणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न झाल्यानंतर ते दोघेही सिद्धार्थने नुकत्याच खरेदी केलेल्या 70 कोटींच्या घरात राहायला जाणार आहेत. त्यांचे हे घर मुंबईतील जुहूयेथे आहे. शिवाय हे सी फेसिंग आहे. हे 3,500 स्क्वेअर फूट आहे. या आलिशान घराचं इंटीरियर शाहरुख खानच्या पत्नीने केलं आहे.

- Advertisement -

राजस्थानातील सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडणार सोहळा

कियारा आणि सिद्धार्थ राजस्थानातील सूर्यगड पॅलेसमध्ये शाही पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. हा महाल वाळवंटातील किल्ल्यासारखा आहे. या वाड्यामध्ये सुमारे 80 खोल्या पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. तर हॉटेलमध्ये सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था आहे. त्याचबरोबर पाहुण्यांसाठी 70 हून अधिक वाहनेही बुक करण्यात आली आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज, जग्वार आणि बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचा समावेश आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जुळलं प्रेम

सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी शेरशाह या ऑनस्क्रीन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला, पण पापाराझींच्या कॅमेऱ्यात दोघांचं नातं त्यांच्या चाहत्यांसमोर उघडपणे समोर आलं. सध्या या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले आहे. दोघांची जोडी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. अनेक पार्ट्यांमध्येही कपल एकत्र दिसत आहे.

 


हेही वाचा :

आज सूर्यगड पॅलेसमध्ये रंगणार कियारा सिध्दार्थचा शाही विवाहसोहळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -