घरमनोरंजनसिध्दार्थचे मराठी पाऊल पडते बॉलिवूडमध्ये

सिध्दार्थचे मराठी पाऊल पडते बॉलिवूडमध्ये

Subscribe

सिध्दार्थ जाधव यांचा यंदाचा झी चित्र गौरवचा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी पाऊल पडते पुढे या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आलं आहे.

मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यंदाचे हे पुरस्काराचे २० वे वर्ष होते. नेहमीप्रमाणेच हा सोहळा मोठ्या दिमाखातपार पडला. गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांनी सन्मानित केलं गेलं. यावर्षीचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सन्मान महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवला देण्यात आला. हिरो म्हणजे देखणा चेहरा हा समज ज्याने खोडून काढणार एकमेव अभिनेता म्हणजे सिध्दार्थ जाधव. गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवणारा सिध्दार्थने बॉलिवूडमध्येही आपलं नाव कमवायला सुरूवात केली आहे.

sidharth jadhav
सिध्दार्थ जाधव

हिंदी चित्रपट सृष्टीतल्या बड्या बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सिद्धार्थने त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं. केवळ मराठी नाही तर हिंदी टेलिव्हिजनचाही सिद्धार्थ महत्त्वाचा चेहरा ठरला. यावर्षी प्रदर्शित झालेल्या सिम्बा या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत आपला सिद्धू स्क्रिनवर येतो तेव्हा आम्हामराठी प्रेक्षकांची अभिमानाने कॉलर टाइट होते. म्हणूनच सिध्दार्थला या वर्षीचा मराठी पाऊल पडते पुढे या गौरवाने सन्मानित करण्यात आलं.

- Advertisement -

फिल्मफेअरमध्येही सिध्दार्थचा जलवा

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिध्दार्थची मैत्री आता सगळ्यांनाच माहितेय. सिम्बा चित्रपटादरम्यान यांची मैत्री झाली. आणि त्यांची ही यारी फिल्मफेअरमध्येही बघायला मिळाली. रणवीरने सिध्दार्थला बघताच त्याची भेट घेतली. रणीवरने सिध्दूची ओळख यावेळी रणबीर कपूर, आलिया भट आणि दिपीकाशी करून दिली. फोटोग्राफरलाही हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -