26 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसून येतील. यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नेहमीपेक्षी अधिक खास असणार आहे. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर अनेक दिवसानंतर एकत्र सादरीकरण करताना दिसतील.
View this post on Instagram
झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत त्यांना अनोखी मानवंदना दिल्याचे दिसत आहे. यावेळी अशोक मामांना सिद्धार्थ गळ्यात हार घालून साष्टांग नमस्कार घालतो. हे पाहून अशोक मामांच्या डोळ्यात पाणी येतं.
शिवाय यंदाच्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण 50 वर्ष कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत सर्वजण ‘अशोक मामा’ या नावाने देखील ओळखतात. अशोक मामा यांनी हिंदी चित्रपट, 200 च्या आसपास मराठी चित्रपट, 15 टेलिव्हिजन मालिका, 25 नाटकं आणि अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळतं.
हेही वाचा :