घरमनोरंजनKiara-Sidharth Anniversary : अशी सुरू झाली होती सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Kiara-Sidharth Anniversary : अशी सुरू झाली होती सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Subscribe

बॉलिवूड मधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी या जोडीचे लाखो चाहते आहेत. वर्षभरापूर्वी हे लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून ही जोडी सतत चर्चेत असते. दरम्यान, आज 7 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. पण या दोघांची लव्ह स्टोरी नक्की कधी आणि कशी सुरू झाली हे तुम्हाला माहित आहे का?

लव्ह, ब्रेकअप ते पॅचअप अशी आहे लव्ह स्टोर

लग्नापूर्वी काही वर्ष सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी पहिल्यांदा ‘शेरशाह’ या ऑनस्क्रीन चित्रपटात दिसली होती. ‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान हे दोघे प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही अनेकदा आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला, पण अनेकदा कॅमेऱ्यात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

 

- Advertisement -

दरम्यान, त्यानंतर काही काळ यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. ब्रेकअपच्या काही दिवसांनंतर कियाराने सिद्धार्थला ‘भूल भुलैया 2’ साठी फोन केला त्यावेळी एकमेकांसोबत बोलून दोघंही भावूक झाले होते. त्यानंतर दोघंही पुन्हा एकत्र आले. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2023 रोजी हे विवाहबंधनात अडकले.

- Advertisement -

‘या’ चित्रपटात दिसणार सिद्धार्थ

सध्या सिद्दार्थ त्याच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’मुळे चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तो येत्या काळात सिद्धार्थ ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच कियारा आगामी काळात ‘डॉन 3’ आणि ‘गेम चेंजर’ या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा : “शाळांमधून ‘रामायण शिकवायला हवं” – दूरदर्शनचे ‘राम’ अरुण गोविल यांचे प्रतिपादन !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -