लग्नानंतर पहिल्यांदा अवॉर्ड शोमध्ये एकत्र स्पॉट झाले सिद्धार्थ-कियारा; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थानातील जैसलमेर सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी लग्न केलं. लग्न झाल्यापासून कियारा-सिद्धार्थ सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. अशातच ही जोडी आता एका अवॉर्ड शोमध्ये देखील स्पॉट झाली आहे. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, कियारा-सिद्धार्थचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय ज्यात दोघं एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते खूप खूश झाले आहेत.

शाही थाटात पार पडलं होतं लग्न

राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्रात कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती.

 


हेही वाचा :

urfi javed- महिलांनो पुरुषांच्या मागे धावण्यापेक्षा पैशांचा मागे धावा उर्फीचा भन्नाट सल्ला