घरमनोरंजनरणबीर-आलियाला मागे टाकत सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी बनवला रेकॉर्ड

रणबीर-आलियाला मागे टाकत सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी बनवला रेकॉर्ड

Subscribe

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची पोस्ट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली आहे.

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून काही क्षणातच यांच्या फोटोंनी अनेक रेकॉर्ड बनवले. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नांच्या फोटोंना भारतामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नांच्या फोटोने बनवला रेकॉर्ड

- Advertisement -

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंना 13.49 मिलियनपेक्षा जास्त इंस्टाग्राम युजर्सने लाईक केलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची पोस्ट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

यापूर्वी, आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाच्या फोटोला 13.19 मिलियन लाईक्स मिळवून विक्रम केला होता. त्यामुळे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंना इतर भारतीय कलाकारांना तुलनेत सोशल मीडियावर जास्त पसंती मिळाली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न डिसेंबर 2021 मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाच्या फोटोंना 12.6 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डी-डेवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू केला होता. 11 डिसेंबर 2017 रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या फोटोंना 4.4 मिलियन युजर्सने या पोस्टला लाईक केले होते.

- Advertisement -

सिद्धार्थ-कियाराचं लग्न चर्चेत

लग्रात कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती. यावेळी फोटोंसोबत खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “अब हमारी परमनंट बुकिंग हो गई, आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.” असं कियारा-सिद्धार्थने लिहिलंय. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा :

16 वा दिवसही धमाकेदार; ‘पठाण’ने जमावले इतके कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -