बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नेहमीच त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अलीकडेच दिवाळीनिमित्त सिद्धार्थने पत्नी कियारा अडवाणीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. अशातच आता सिद्धार्थ मल्होत्राचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सिद्धार्थवेगळ्या अंदाजात दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्राचा डान्स व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या सिद्धार्थच्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ डान्स करताना दिसत आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ त्याच्या जवळच्या मित्राच्या लग्नातील वरातीचा आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.
या व्हिडीओवर एकाने कमेंट करत लिहिलंय की, ‘तू खूप क्यूट सिद्धार्थ मल्होत्रा आहेस’. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मित्राच्या लग्नात असा डान्स करायला हवा. याशिवाय इतर यूजर्स सिद्धार्थ मल्होत्राच्या डान्सचे कौतुक करताना दिसले.
‘या’ चित्रपटात दिसणार सिद्धार्थ
सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्समध्ये आणि योद्धा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.