Most Searched Celebrity of 2021: सिद्धार्थ शुक्ला २०२१च्या टॉप सर्चच्या यादीत

२०२१मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं त्यानंतर गुगुल सिद्धार्थ शुक्ला हे नाव सर्वाधिक सर्च केल्याचं समोर आलं आहे.

Siddharth Shukla in the list of Most Searched Celebrity of 2021
Most Searched Celebrity of 2021: सिद्धार्थ शुक्ला २०२१च्या टॉप सर्चच्या यादीत

वर्षातील शेवटचा महिना सुरू झाला आहे. २०२१मध्ये टॉप सर्च केल्या गेलेल्या लोकांची यादी नुकतीच याहूने घोषित केली आहे. गूगल या सर्च इंजिनद्वारे लोक आपल्या आवडत्या गोष्टी सर्च करत असतात. याहूने जारी केलेल्या यादीत टॉप सर्च केलेल्या सेलिब्रेटींची नावे देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर लोकांची नावे देखील या यादीत आहेत. याहूने जारी केलेल्या यादीत बॉलिवूडचा दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे नाव आहे. २०२१मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं त्यानंतर गुगुल सिद्धार्थ शुक्ला हे नाव सर्वाधिक सर्च केल्याचं समोर आलं आहे.

२०२१मध्ये लोकांनी सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या कलाकारांच्या नावात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खानचे नाव आहे. त्यानंतर तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचं नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेता अल्लू अर्जूनचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन चर्चेत आहे.

 

त्याचप्रमाणे याहू जारी केलेल्या यादीत टॉप सर्च अभिनेत्रींची नावं देखील आहे. यात पहिल्या क्रमांकावर अभिनेत्री करिना कपूर आहे . तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोनने या यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. तर आलिया भट्ट या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच अभिनेत्री समांथा प्रभू या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा  – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील सीन वाचता न येणारी परी अशी करते शूटची तयारी?