Sidharth Malhotraचा श्वान ‘ऑस्कर’चे निधन, कथित GF कियाराही झाली इमोशनल

ऑस्कर सिद्धार्थचा जिव की प्राण आहे. मात्र त्याचा हाच प्राण आता त्याला सोडून गेला आहे. सिद्धार्थचा श्वास ऑस्करचे नुकतेच निधन झाले. सिद्धार्थने सोशल मीडियावर ऑस्करसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

Sidharth Malhotra pet dog Oscar dies Kiarahi advani became emotional
Sidharth Malhotraचा श्वान 'ऑस्कर'चे निधन, कथित GF कियाराही झाली इमोशनल

Sidharth Malhotra : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा प्राणी प्रेमी आहे हे त्याच्या सर्व चाहत्यांना माहिती आहे. सिद्धार्थच्या घरी देखील त्याच ऑस्कर नावाचा लाडका श्वान आहे. ऑस्करवर सिद्धार्थचा विशेष जीव आहे. तो अनेकदा ऑस्करसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. ऑस्कर सिद्धार्थचा जिव की प्राण आहे. मात्र त्याचा हाच प्राण आता त्याला सोडून गेला आहे. सिद्धार्थचा श्वास ऑस्करचे नुकतेच निधन झाले. सिद्धार्थने सोशल मीडियावर ऑस्करसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

ऑस्करच्या निधनानंतर सिद्धार्थने ऑस्करचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटलेय, ‘त्याच्याशिवाय माझी सकाळी अर्धवट आहे. घरी परत येणे आणि दरवाजा खोलणे आता पहिल्यासारखं राहणार नाही. तु मला निवडलेस यासाठी मी तुझा आभारी आहे. तुझ्याकडून मी खूप काही शिकलो. लव्ह यू मेरे ऑस्कर’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

सिद्धार्थच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रेटींनी ऑस्करला श्रद्धांजली वाहिली. सिद्धार्थची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री कियारा आडवाणीने देखील ऑस्करच्या निधनानंतर त्याचे सिद्धार्थ सोबतचे फोटो शेअर केलेत.

‘बेस्ट बॉइज’, म्हणत कियारा देखील भावूक झाल्याचे दिसले. फोटोमध्ये सिद्धार्थ आणि ऑस्करची बॉडिंग दिसून येत आहे.

 

कियारासोबत सिद्धार्थच्या बॉलिवूडमधील अनेक मित्र मैत्रिणींनी ऑस्करला श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री अलिया भट्ट, कृती सेनॉन, डायना पेंटी, रकुल प्रीत, करण जोहर, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, टायगर श्राफ, भूमी पेडणेकर यासारख्या अनेक कलाकारांनी ऑस्करसाठी प्रेम व्यक्त केले आहे.


हेही वाचा – Farhan Shibani Wedding : लग्नानंतर शिबानीने बदलले नाव, आता शिबानी दांडेकर नाही…