घरमनोरंजनMarjaavan Trailer: 'मरजावां' चित्रपटाचा दमदार ट्रेलर आऊट

Marjaavan Trailer: ‘मरजावां’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर आऊट

Subscribe

'मरजावां'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दिसणार वेगळा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा मरजावां (Marjaavan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता फक्त या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपट निर्मात्यांनी गुरूवारी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

- Advertisement -

मरजावां (Marjaavan) या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा वेगळा अंदाज त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. यापुर्वी देखील काही चित्रपटांमध्ये सिद्धार्थचा ‘अँग्री यंगमॅन’ लूक बघायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री तारा सुतारिया आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. ‘एक विलेन’ या चित्रपटानंतर रितेश पुन्हा एकदा त्याच्या वेगळ्या स्टाईलमध्ये बघायला मिळणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रकुल प्रीत सिंह एका डान्सरची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

भरमसाठ डायलॉग असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर मात्र सस्पेन्सने संपत असल्याने मरजावां (Marjaavan) या चित्रपटाची असणारी उत्सुकता चाहत्यांमध्ये आणखी वाढली आहे. मरजावां हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता मात्र, ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफचा वॉर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून २२ नोव्हेंबर करण्यात आली आहे. या कारणाने निर्मात्यांनी मरजावांला (Marjaavan) ८ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -