Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन sidharth shukla:पारस छाबराने शेअर केला सिद्धार्थच्या शोकसभेचा भावनिक व्हिडिओ

sidharth shukla:पारस छाबराने शेअर केला सिद्धार्थच्या शोकसभेचा भावनिक व्हिडिओ

या प्रार्थना भेटी दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाचे ते क्षण देखील दाखवले गेले होते ज्यात त्याने ब्रह्मकुमारी आश्रमाच्या सत्संगात भाग घेतला होता.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या(sidharath shukla) आकस्मिक निधनानंतर त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. (sidharath shukla death)मात्र सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.  सिद्धार्थने मनोरंजन सृष्टीत नाव कमावण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती. त्याने अनेक हिट सिरीयल मध्ये काम केलं मात्र बिग बॉसच्या(bigg boss) घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर त्याच्या करीयरला वेगळं वळण मिळालं असे म्हणायला हरकत नाही. (bigg boss 13 winner)बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सिद्धार्थच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली होती. सिद्धार्थने 2 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला दरम्यान सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या घरी एक शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोकसभा ब्रम्ह कुमारी आश्रमच्या तत्वाधानमध्ये ठेवण्यात आली होती. यावेळी सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी तसेच कलाकारांनी हजेरी लावली होती.(sidharth shukla prayer meet video share by paras chhabra)

शोकसभेवेळी सिद्धार्थचा मित्र अभिनेता पारस छाबरा(Paras chhabra) देखील उपस्थित होता. पारसने शोकसभेचा एक व्हिडिओ शेअर केलाआहे. या व्हिडिओमध्ये ब्रम्ह कुमारी आश्रम मधील सिस्टर शिबानी बोलताना दिसत आहे की, ज्या वेळी सिद्धार्थचे निधन झाले त्यावेळी सिद्धार्थच्या आई रीता शुक्ला(sidharath mother rita shukla) यांची हालत कशी झाली होती. त्या म्हणाल्या, 2 तारखेच्या संध्याकाळी, जेव्हा मी रिटा बहिणीशी फोनवर बोलले, म्हणजे सिद्धार्थची आई.  मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्या फोनवर 00म्हणाला – ओम शांती. या ओम शांतीमध्ये इतकी स्थिरता होती, इतकी शक्ती होती. मला वाटले अरे देवा ही शक्ती काय आहे जी या आईच्या तोंडून बोलत आहे.मग मी म्हणालो – रीता बहिण, तू ठीक आहेस, मग त्या म्हणाला – माझ्याकडे देवाची शक्ती आहे. किती महान आत्मा, ज्याची आई इतकी महान आहे की त्या वेळी त्याच्या मनात एकच संकल्प आहे की तो जिथे जाईल तिथे तो आनंदी असेल.

व्हिडिओ पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra)

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर करत पारस छाबरा यांनी सिद्धार्थच्या आईलाही सशक्त म्हटले आहे. पारसने लिहिले, ‘रीटा आंटी, देव तुम्हाला अधिक शक्ती देवो. आणि हे ऐकल्यावर मला सुद्धा थोडी ताकद मिळाली.या सुंदर सत्संगाबद्दल अनेक धन्यवाद. या प्रार्थना भेटी दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाचे ते क्षण देखील दाखवले गेले होते ज्यात त्याने ब्रह्मकुमारी आश्रमाच्या सत्संगात भाग घेतला होता.


- Advertisement -

हे हि वाचा – sidharth shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांचे ‘हे’ आहे ऑफिशियल स्टेटमेंट

- Advertisement -