सिद्धार्थ शहनाजला म्हणतोय ‘शोना शोना’

Sidharth Shukla and Shehnaaz Gill Shona Shona song poster out
सिद्धार्थ शहनाजला म्हणतोय 'शोना शोना'

देशातील सर्वात मोठा रियलिटी शो ‘बिग बॉस’मुळे अनेक लोकांचे आयुष्य बदललं आहे. यापैकी एक जोडी म्हणजे सिडनाज. बिग बॉस सीझन १३ मधील या सिडनाज जोडीने अनेकांची मनं जिंकली. आता सिडनाजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. जशी केमिस्ट्री सिद्धार्थ आणि शहनाजची शोमध्ये दिसली होती. आता तशीच केमिस्ट्री एका गाण्यातून पाहायला मिळणार आहे.

सिडनाज एका नवा म्युझिक व्हिडिओ ‘शोना शोना’ प्रदर्शित होणार आहे. या म्युझिक व्हिडिओचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून सध्या तो ट्रेंड होत आहे. पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांच्या प्रेमात मग्न झालेले दिसत आहेत. एकबाजूला सिद्धार्थाचा डॅशिंग अंदाज चाहत्यांना आवडत आहे. तर दुसऱ्याबाजूला शहनाजचा क्यूटनेस सर्वांना घायाळ करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थ आणि शहनाजचे हे नवं गाणं २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. गाण्यात टोनी कक्कर आणि नेहा कक्कर आवाज ऐकायला मिळेल. दरम्यान गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे सिडनाजच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या शूटिंगच्या चर्चेला उधाण आलं होत. चंदीगढमध्ये या म्युझिक व्हिडिओची शूटिंग झाली होती. दोघांनी शूटिंग दरम्यान खूप मस्ती केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

यापूर्वी सिडनाजचे ‘भुला दुंगा’ हा म्युझिक व्हिडिओ आला होता. या व्हिडिओने अनेक रिकॉर्ड ब्रेक केल होते. सिडनाज हे गाणं अनेक महिने सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. आतापर्यंत या गाण्यांला २ मिलियन पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहे. तसेच ९४ मिलियन या व्हिडिओ व्ह्यूज मिळाले आहेत.


हेही वाचा – ‘या’ सीनमुळे ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर कारवाई होणार!