Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Sidnaazचा झाला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न!

Sidnaazचा झाला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न!

Related Story

- Advertisement -

बिग बॉस सीझन १३ विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या अचानक जाण्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. शुक्रवारी सिद्धार्थ शुक्ला पंचतत्वात विलीन झाला. सिद्धार्थच्या जाण्याने त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला मानसिक धक्का बसला आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात सिद्धार्थ आणि शेहनाज लग्न करणार होते. त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. ते सध्या लग्नाची तयारी करत होते, असे टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली आहे.

माहितीनुसार, सिडनाजने लग्नाबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे सध्या लग्नाची तयारीत ते व्यस्त होते. लग्नाच्या निमित्ताने मुंबईतील हॉटेलसह रुमसंबंधित बातचित सुरू होती. सिडनाजचा लग्नाचा सोहळा ३ दिवसांचा होता. सिद्धार्थ आणि शेहनाजने आपल्या मित्रांपासून या गोष्टी सीक्रेट ठेवल्या होत्या. पण यादरम्यान २ सप्टेंबरला सिद्धार्थच्या निधनाची दुःख बातमी समोर आली.

- Advertisement -

सिद्धार्थच्या अचानक निधन झाल्यामुळे सिडनाजचे लग्न करण्याचे स्वप्न अधूरे राहिले. सिद्धार्थ आणि शेहनाज आता कधी एकाबंधनात अडकणार नाही आहेत. दोघांची जोडी तुटल्यामुळे चाहते देखील खूप दुःखी झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि शेहशाजचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. शेहनाजला धीर देण्यासाठी चाहते अनेक वेगवेगळ्या पोस्ट लिहित आहे.

सिद्धार्थला शेवटचा निरोप देताना शेहनाज अवस्था खूप बिकट झाली होती. तिचे अश्रू अनावर झाले होते. तिला कोणतीही शुद्ध नव्हती. तिची अशी अवस्था पाहून अनेक कलाकारांनी तिच्याबद्दलची सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती.


- Advertisement -

हेही वाचा – जावेद अख्तर यांनी तालिबान्यांसोबत केली RSSची तुलना, म्हणाले…


- Advertisement -