घरताज्या घडामोडीsidharth shukla death: सिद्धार्थ शुक्लासोबत मृत्यूपूर्वीच्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

sidharth shukla death: सिद्धार्थ शुक्लासोबत मृत्यूपूर्वीच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची (sidharth shukla death) बातमी ऐकून प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईतील कूपर रुग्णालयात सिद्धार्थचा मृतदेह असून डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे जाहीर केले आहे. कूपर रुग्णालयात अजूनही सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. पण सध्या सिद्धार्थच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी औषध घेतले होते, ज्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. डॉक्टरांनी जरी सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे जाहीर केले असले तरी दुसऱ्याबाजूला अजून एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्ला शेवटच्या रात्री बीएमडब्ल्यू गाडीतून आपल्या फ्लॅटवर पोहोचला होता. त्याच्या गाडीच्या मागची काच पूर्णपणे फुटली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

- Advertisement -

त्याच्या गाडीची ही परिस्थितीत पाहून असा तर्क लावला जात आहे की, शेवटच्या रात्री सिद्धार्थचे कोणासोबत भांडण झाले होते का? असे काय झाले ज्यामुळे सिद्धार्थच्या गाडीची काच फुटली होती? त्याचे कोणासोबत भांडण झाले होते, ज्यामुळे तो अस्वस्थ झाला होता का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नाही आहे. सिद्धार्थच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sidharth Shuklaने तीन दिवसांपूर्वीच केली होती इन्स्टाग्राम-टि्वटरवर शेवटची पोस्ट


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -