घरमनोरंजनsidharth shukla: सिद्धार्थने शेहनाजच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

sidharth shukla: सिद्धार्थने शेहनाजच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

Subscribe

सिद्धार्थ रात्री साडेनऊ वाजता घरी आला तेव्हा त्याची तब्येत बिघडली त्याला अस्वस्थ वाटू लागले.दरम्यान यावेळी सिद्धार्थची आई आणि शेहनाज घरी होत्या त्यांनी सिद्धार्थला लिंबूपाणी दिले

बिग बॉस सीझन १३ विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा काल, गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले (sidharth shukla death). यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसह हिंदी टेलिव्हिजन इंडट्रीमध्ये शोककाळ पसरली आहे. मात्र सिद्धार्थच्या अचानक एक्झिटमुळे अभिनेत्री शहनाज गिलला(shehnaaz gill) प्रचंड मोठ्ठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.(sidharth shukla death shehnaaz gill father satement after death)

माहितीनूसार, शहनाज गिलचे वडिल संतोख सिंह सुख(Shehnaaz gill father) यांनी माध्यमांशी फोनवर बोलताना सांगितले आहे की, शेहनाज सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. जे काही घडले त्यावर माझा देखील विश्वास बसत नाहीये.तसेच शेहनाज बद्दल विचारले असता संतोख सिंह म्हणाले की,मी शेहनाजशी फोनवर बोललो आहे. तीला प्रचंड मोठ्ठा धक्का बसला आहे. ” तर दुसरीकडे शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतल्याने म्हटले जात आहे.

- Advertisement -

ईटाम्सला सुंत्रानी दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री साडेनऊ वाजता घरी आला तेव्हा त्याची तब्येत बिघडली त्याला अस्वस्थ वाटू लागले.दरम्यान यावेळी सिद्धार्थची आई आणि शेहनाज घरी होत्या त्यांनी सिद्धार्थला लिंबूपाणी दिले आणि त्यांनतर आईस्क्रिम खाण्यास सांगितले. मात्र सिद्धार्थच्या छातीत दुखणे सुरू होते. सिद्धार्थला झोप येत नव्हती. तर त्याने शेहनाजला त्याच्या जवळ झोपायला सांगितले आणि पाठीवर थाप मारण्यास सांगितले. रात्री दिडच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाजच्या मांडीवर झोपला आणि त्याचा झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर शेहनाजला ही नकळत झोप लागली. सकाळी 7 च्या सुमारास शेहनाज उठली तेव्हा तिने पाहिले की सिद्धार्थ रात्रभर त्याच स्थितीत झोपला होता. यानंतर शेहनाजने सिद्धार्थला उठवण्याच्या पर्यत्न केला पण सिद्धार्थने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने शेहनाज गोंधळून गेली तिने धावत 15 व्या मजल्यावरुन 5 व्या मजल्यावर असलेल्या सिद्धार्थच्या आईच्या घरी गेली आणि त्यांनी लगेच फॅमिली डॉक्टरला फोन केला. डॉक्टर घरी आले तेव्हा त्यांनी सिद्धार्थला मृत घोषित केले.


हे हि वाचा – सिद्धार्थच्या मृत्यूमुळे शहनाजला धक्का; शहनाजच्या वडिलांनी केला खुलासा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -