Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सिद्धार्थ शुक्लाच्या डुप्लिकेटचे Video Viral, चाहते झाले भावूक

सिद्धार्थ शुक्लाच्या डुप्लिकेटचे Video Viral, चाहते झाले भावूक

Related Story

- Advertisement -

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन १० दिवसांहून अधिक दिवस उलटून गेले आहेत. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याचे कुटुंब आणि चाहते या दुःखातून अजूनही सावरले नाही आहेत. सिद्धार्थचे चाहते सध्या त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच सिद्धार्थ सारखा हुबेहुब दिसणाऱ्या चाहत्याचे सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सिद्धार्थच्या या हमशक्लची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोण आहे हा सिद्धार्थचा डुप्लिकेट? जाणून घ्या.

सिद्धार्थ शुक्लाच्या या डुप्लिकेटचे नाव चंदन आहे. चंदन सिद्धार्थच्या अनेक डायलॉगचे इन्स्टावर रिल्स करतो. चंदन सिद्धार्थचा चाहता आहे. बऱ्याच काळापासून सिद्धार्थची स्टाईल चंदन कॉपी करतोय. सध्या चंदनचे व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले आहेत. चंदनचा लूक आणि ड्रेसिंग सेंसही सिद्धार्थ सारखा आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अचानक चंदनचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत. सिद्धार्थचे चाहते हे व्हिडिओ पाहून खूप भावूक होत आहेत. अनेक चाहत्यांना चंदनमध्येच सिद्धार्थ दिसत आहे. काही लोकांना असे वाटतं आहे की, सिद्धार्थ अजूनही या जगात आहे.

चंदनची इन्स्ट्राग्रामवर चांगले फॉलोवर्स आहेत. १० हजारांहून अधिक लोकं चंदनला फॉलो करतात. २ सप्टेंबरला सिद्धार्थचे निधन झाल्यानंतर अचानक चंदनची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.

- Advertisement -

काही लोकांना चंदनचे व्हिडिओ आवडत असून काहींना अजिबात आवडत नाही आहेत. अनेक जण चंदनच्या व्हिडिओवर नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. एका सिद्धार्थच्या चाहत्याने लिहिले आहे की, ‘भावा, तू सिद्ध वाटतोयस.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘सिद्धार्थला कॉपी करणे बंद कर. बकवास वाटतोस, त्याच्यासारखे कोणीच नाही.’


हेही वाचा – विद्युत जामवालने ‘कमांडो’ स्टाईलने नंदिता महतानीसोबत केला साखरपुडा


- Advertisement -