घरमनोरंजनSiddharth Shukla चं शेवटचं Song रिलीज, अभिनेत्याला पाहून चाहते भावूक

Siddharth Shukla चं शेवटचं Song रिलीज, अभिनेत्याला पाहून चाहते भावूक

Subscribe

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले होते. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सिद्धार्थचे नाव वापरायचे असेल तर आधी त्याची परवानगी घ्यावी लागेल, अशी विनंती त्यांनी केली

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla Last Music Video)  याचं शेवटच गाणं ‘जीना जरुरी है’ रिलीज झाले आहे. या गाण्यात ‘बिग बॉस 15’ चा स्पर्धक विशाल कोटीयन (Vishal Kotian) आणि गायिका दीपिका त्रिपाठी देखील झळकणार आहे. गेल्या वर्षी या गाण्याचे चित्रीकरण झाले होते. या गाण्याचा रिलीजचा व्हिडीओ शेअर करत विशालने सिद्धार्थसाठी एक कॅप्शनही लिहिली आहे. (Sidharth Shukla)

अनेक चाहते सिद्धार्थचं हे शेवटं गाणं पाहून भावूक झालेत, तर काही युजर्सनी गाणं रिलीज करण्यावरून विशालवर संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, विशालने हे गाणं रिलीज करण्याआधी सिदच्या कुटुंबियांना विचारायला हवे होते. (Sidharth Shukla Fans Slams)

- Advertisement -

Most Searched Celebrity of 2021: सिद्धार्थ शुक्ला २०२१च्या टॉप सर्चच्या यादीत

या गाण्यात एकाटचं मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या दोन भावांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थची किलर स्माईल, नैसर्गिक अभिनय आणि त्याच्या डोळ्यातील निरागसपणा पाहून अनेकांना त्याची पुन्हा आठवण येत आहे.


विशाल कोटियनने बिग बॉस 15 मध्ये या गाण्याचा उल्लेख केला होता. सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे त्याच्यासोबत शूट झाल्याचे त्याने सांगितले होते. जेव्हा तो या शोमधून बाहेर जाईल तेव्हा तो हे गाणं रिलीज करेल असे सांगितले. दरम्यान सिद्धार्थच्या कुटुंबियांना आता या व्हिडीओनंतर एक निवेदन जारी केले आहे. (Sidharth Shukla Family)

- Advertisement -

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले होते. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सिद्धार्थचे नाव वापरायचे असेल तर आधी त्याची परवानगी घ्यावी लागेल, अशी विनंती त्यांनी केली. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘सिद्धार्थ आता पुढे गेला आहे आणि आता तो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, पण तरीही तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आम्ही त्याच्या इच्छेचे रक्षण करत आहोत. ज्या कोणाला सिद्धार्थचे नाव किंवा त्याचा चेहरा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये वापरायचा असेल तर त्यांनी प्रथम आमच्याशी संपर्क साधा. त्याला काय हवे होते ते आम्हाला माहीत आहे. जर असा एखादा प्रोजेक्ट असेल ज्यावर तो खूश नसेल तर त्याने तो रिलीज केला नसता याची आम्हाला खात्री आहे. तो आमच्यासोबत असताना त्याने तो प्रोजेक्ट जारी केला नसता तर कदाचित त्याची याला संमती नसेल. त्यामुळे त्यांच्या इच्छा लक्षात घेऊन, त्यांनी आमच्यासाठी सोडलेल्या स्मृतींना स्मरणात ठेवा.

सिद्धार्थ शुक्लाचा 2 सप्टेंबर 2021 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, मृत्यूपूर्वी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली होती. त्याला अस्वस्थ वाटत होते त्यामुळे तो औषध घेऊन झोपी गेला. मात्र रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. त्यांचे कुटुंबीय आणि खास मैत्रिण शहनाज गिल अजूनही त्यांच्या जाण्याचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.


pune news : लाल महालात लावणी,आव्हाडांचा ट्विट करून निषेध

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -