Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन sidharth shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांचे 'हे' आहे ऑफिशियल स्टेटमेंट

sidharth shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांचे ‘हे’ आहे ऑफिशियल स्टेटमेंट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्वाच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय. सिद्धार्थचे चाहते त्याच्या कुटुंबियांसाठी आणि शहनाज गिलसाठी प्रार्थना करतायत. यानंतर सोमवारी सिद्धार्थच्या कुटुंबियांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, “सिद्धार्थच्या आयुष्याच्या प्रवासात भाग राहिलेल्या आणि त्याच्यावर नि:स्वार्थई प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. हा प्रवास नक्कीच इथेच संपत नाही कारण सिद्धार्थ शुक्ला आता आपल्या सगळ्यांच्या ह्रदयात कायमचा राहील! मात्र त्याच्या खासगी मान राखावा अशी विनंती आहे. या कठीण काळात आम्हाला एकट्याला सोडा.” असं या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलंय.

- Advertisement -

Sidharth Shukla’s family issues first statement after his death: ‘It definitely doesn’t end here’
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांचे ‘हे’ आहे ऑफिशियल स्टेटमेंट

या अधिकृतरित्या जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये सिद्धार्थच्या कुटुंबियांनी, “मुंबई पोलीस दलाच्या संवेदनशीलता आणि सहानभूतीबद्दल मुंबई पोलिसांनी केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत. तसंच त्या दिवसाच्या प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी उभे राहिले, आमची काळजी घेतली आणि आम्हाला वाचवले. आपणा सर्वांना विनंती आहे की सिद्धार्थला आपल्या आठवणी आणि प्रार्थनांमध्ये ठेवा. ओम शांती …. शुक्ला कुटुंब. ”

- Advertisement -

तसेच त्याला मनात आणि आठवणीत ठेवा अशीही भावना सिद्धार्थच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी’ या शो मध्ये गेस्ट म्हणून आले होते. मात्र सिद्धार्थच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडला खुप मोठा धक्का बसला आहे.


अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतू’ च्या शूटिंगला ऑक्टोबरपासून सुरुवात


 

- Advertisement -