Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवालाच्या आधी या पंजाबी गायकांच्या झाल्या आहेत हत्या?

मूसेवालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, मात्र पंजाबमध्ये प्रसिद्ध गायकाला गुन्हेगारांकडून लक्ष करत हत्या केल्याची ही पहिला घटना नाही.

sidhu musewala murder case many singers gunned down in punjab earlier
Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवालाच्या आधी या पंजाबी गायकांच्या झाल्या आहेत हत्या?

पंजाबचा प्रसिद्ध आणि इतकाच वादग्रस्त गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर (Sidhu Moose Wala Dead) पंजाबमधील राजकारण चांगलेच तापलेय. गायकाच्या भररस्त्याती हत्येनंतर आता विरोधी पक्ष नेते पंजाबमधील भगवंत मान सरकारवर हल्लाबोल करत आहे. कारण सिद्धू याच्या हत्येपूर्वी एक दिवस आधी त्याची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. (Sidhu Moose Wala Video On Tweeter)

मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळी झाडण्यात आली, यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, मात्र पंजाबमध्ये प्रसिद्ध गायकाला गुन्हेगारांकडून लक्ष करत हत्या केल्याची ही पहिला घटना नाही. याआधीही पंजाबमध्ये अनेक बड्या गायकांची अशाप्रकारे निघृण हत्या झाली आहे, त्यामुळे मुसेवालाआधी कोणत्या गायकांची अशाप्रकारे हत्या झाली ते आपण जाणून घेऊ…

2018 मध्ये गायक परमीश वर्मावर गोळीबार

2018 मध्ये पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मा (Parmish Verma) याच्यावरही जीवघेणा हल्ला झाला, पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला, परमीश वर्माला गुडघ्याला गोळी लागली होती, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला. परमीश वर झालेला हल्ला खंडणीसाठी करण्यात आला होता त्याचा आरोप गँगस्टर दिलप्रीत बावावर होता, त्याच्यावरही खटला सुरू आहे.

1996 मध्ये दिवशाद अख्तरवर हल्ला

दरम्यान 1996 च्या काळातील प्रसिद्ध गायक दिलशाल अख्तरलाही पंजाबमध्ये गुन्हेगारांनी लक्ष्य केले होते.

90 च्या काळात प्रसिद्ध गायक चमकीलाची पत्नीसह हत्या

पंजाबमध्ये 90 च्या दशकात प्रसिद्ध गायक, संगीतकार, अमरसिंह चमकीला (Amar Singh Chamkila) आणि त्याची पत्नी अमरजोतची गुन्हेगारांनी निघृण हत्या केली होती. 8 मार्च 1988 रोजी तो आपल्या पत्नीसह कारमधून कुठे जात असताना त्याच्यावर गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकललेले नाही.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली आहे.  सिद्धूच्या गाडीचा पाठलाग करून त्याच्यावर तब्बल ३० गोळ्या फायर करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. मूसेवाला याची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावरून हल्लेखोरांनी या घटनेला लक्ष्य केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. मूसवाला पंजाबचा टॉप मोस्ट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर होता.


पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा