घरमनोरंजनSiima Award 2021 रश्मिकाला मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा अवॉर्ड तर महेश बाबू ठरला...

Siima Award 2021 रश्मिकाला मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा अवॉर्ड तर महेश बाबू ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

Subscribe

बहुचर्चित सिनेमा अवॉर्ड सोहळ्यामध्ये अनेक नामी हस्तींनी पुरस्कारावर नाव कोरले असून Siima ने अवॉर्ड जिंकणाऱ्या सर्वी सेलिब्रीटींची नावे जाहीर केली आहेत.

दाक्षिणात्य सिनेमाची क्रेज सगळीकडेच पाहायला मिळते. सिनेमातील सुपरस्टारची चर्चा , धम्माल अॅक्शन, रोमॅँटीक सिन्स पाहून प्रत्येक प्रेक्षक आकर्षित होतो. नुकतचं साउथ इंडियन इंटनॅशनल मूवी अवॉर्ड म्हणजेच Siima Award 2021 चे आयोजन हैद्राबादमध्ये करण्यात आले होते. या अवॉर्डस नाईट्समध्ये साउथ सिनेसृष्टीतील सर्व सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती. अनेक लोकप्रिय कलाकारांनी ट्रॉफीवर नाव कोरले. तसेच साउथ सुपरस्टार डॅशिंग हिरो महेश बाबू (mahesh babu)याला महर्षी सिनेमासाठी बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला (Rashmika Mandana)डियर कॉमरेड साठी बेस्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला आहे.( Siima awards 2021 mahesh babu won best actor rashmika mandanna wins best actress )

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

 या बहुचर्चित सिनेमा अवॉर्ड सोहळ्यामध्ये अनेक नामी हस्तींनी पुरस्कारावर नाव कोरले असून Siima ने अवॉर्ड जिंकणाऱ्या सर्व सेलिब्रिटींची नावे जाहीर केली आहेत. तर अभिनेता धनुषला असुरन सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शिक (तमिल) वेट्रीमारनचा पुरस्कार मिळाला आहे.अवने श्रीमन्नरायण या सिनेमासाठी रक्षित शेट्टीयाला लीडिंग रोलसाठी- क्रिटिक्स कन्नड सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळाला आहे.जर्सी आणि गॅंग लिडरसाठी एंटरटेंनमेंट ऑफ द ईयर तेलुगु अवॉर्ड नानी यांना देण्यात आले. दरम्यान, लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड दिग्गज अभिनेभी शीला यांना देण्यात आले. कैथीमध्ये नकारात्मक भूमिकेसाठी अर्जुन दास याला देखील अभिनय कौशल्येच्या बळावर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – Hum do Humare do-‘मिमी’ नंतर कृतिचा दुसरा सिनेमाही होणार ओटीटीवर रिलीज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -