घरमनोरंजनसिक्कीमच्या जेत्सनने पटकावलं 'सा रे ग म प'चं विजेतेपद

सिक्कीमच्या जेत्सनने पटकावलं ‘सा रे ग म प’चं विजेतेपद

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘सा रे ग म प’ लिटिल चँम्स 9 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यात सिक्कीमच्या जेत्सन डोना लामा विजेती ठरली आहे. मागील तीन महिन्यांपासून हा कार्यक्रम सुरु होता. तीन महिन्यांच्या स्पर्धेनंतर जेत्सन डोना लामाच्या नावाची विजेती म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee TV (@zeetv)

‘सा रे ग म प’ लिटिल चँम्स 9 च्या महाअंतिम फेरीत एकूण 6 स्पर्धक पोहोचले होते. यामध्ये हर्ष सिकंदर, रफा यासमीन, अथर्व बक्शी, अतनु मिश्रा, जेटशेन लामा आणि न्यानेश्वरी घाडगे यांचा सहभाग होता. या 6 स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरीत गाण्याची चुरस रंगली होती. सर्वच स्पर्धक उत्तम सादरीकरण करत होते. परंतु यातील 9 वर्षीच्या जेत्सन डोना लामाच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच हर्ष सिकंदर आणि ज्ञानेश्वरी घाडगे हे देखील उपविजेते ठरले आहेत.

- Advertisement -

10 लाखांचं मिळालं बक्षिस

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee TV (@zeetv)

‘सा रे ग म प’ लिटिल चँम्स 9 च्या विजेतीला सुंदर ट्रॉफीसोबतच 10 लाख रुपयांचा चेक देखील बक्षिस म्हणून मिळाला. या संपूर्ण सीझनमध्ये जेत्सनच्या गाण्याची अनेकांना भुरळ पडली होती. तिची गाणं गाण्याची पद्धत, शैली अनेकांना आवडायची.

- Advertisement -

हेही वाचा :

शाहरुखने मला रात्री 2 वाजता फोन केला…आसामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -