गायक कैलाश खेरच्या ‘त्या’ वादग्रस्त ट्विटमूळे सिंधी भाषिक संतप्त!

kailash khair
कैलाश खेर

भारताच्या राष्ट्रगीतामधून सिंध शब्द काढून टाकायला हवा किंवा त्यावर संशोधन व्हायला हवे. कारण सिंध प्रांत हा पाकिस्तान मध्ये आहे असे ट्विट प्रसिद्ध गायक कैलास खेर यांनी केले आहे. या ट्विट नंतर शहरातील सिंधी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

काही दिवसांपूर्वी गायक कैलास खेर याने राष्ट्रगीतासंदर्भात ट्विट करून पंजाब, सिंध, गुजरात मराठा , द्राविड, उत्कल बंग या ओळींमधून सिंध शब्द हटवला पाहिजे, कारण सिंध प्रांत आता भारताच्या नकाशात नाही मग कुठे आहे? असा प्रश्न विचारून पाकिस्तानवर हल्लाबोल केला.  ते पुढे म्हणाले की आता वेळ आली आहे की सिंध हा शब्द राष्ट्रगीत मधून वगळायला हवा किंवा राष्ट्रगीताचे संशोधन व्हायला हवे, खेर यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केले आहे .

या ट्विट नंतर शहरातील सिंधी भाषिकांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक लाल पंजाबी म्हणाले की या प्रकरणी सुप्रीम कोर्टात १३ मे २००५ मध्ये सुनावणी झाली आहे, असे असतांना कैलास खेर यांनी सिंधी भाषिकांच्या भावना जाणून – बुजून दुखावल्या आहेत.

भरत बठिजा आणि ऍड मोनीश भाटिया यांच्या मते सिंधू ही एक प्राचीन संस्कृती असून, सिंधू नदी ही अखंड भारताचा हिस्सा होती,  जे लोक सिंधू नदीकाठी राहत होते त्यांना सिंधी म्हणून संबोधले जात असे, आज जरी सिंध प्रांत पाकिस्तान मध्ये असला तरी सिंधू संस्कृती हा भारताचा अभिन्न अंग आहे. त्यामुळे राष्ट्रगीतामधून सिंध शब्द वगळण्याची मागणी करणे हे केवळ चुकीचेच नाही तर तमाम सिंधी भाषिकांच्या भावना त्यामुळे दुखावण्यासारखे आहे. भाटिजा आणि ऍड मोनिश भाटिया यांनी कैलास खेर यांना या प्रकरणी लीगल नोटीस बजावली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


हे ही वाचा – कंगनाची ‘तेजस’ भरारी, डिसेंबरमध्ये होणार उड्डाण!