घरताज्या घडामोडीलवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

लवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

Subscribe

‘इंडियन आयडल सीझन १२’चे सूचसंचालन करणारा आणि गायक आदित्य नारायण १ डिसेंबरला बोहल्यावर चढणार आहे. लाँग टाईम गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला आदित्य नारायण सुरुवात करणार आहे. आतापासूनच लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. २८ नोव्हेंबरला आदित्य आणि श्वेताचा साखरपुडा (तिलक सेरेमनी) पार पाडली. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये आदित्य आणि श्वेता स्टेजवर बसलेले दिसत आहेत. यादरम्यान आदित्यचे वडील आणि बॉलिवूड गायक उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपा नारायण झा स्टेज उपस्थित आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आदित्य आपल्या घरच्या काही महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान आदित्य आणि श्वेताने साध्या पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरला एका मंदिरात दोघांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात फक्त ५० लोक सहभागी होणार आहेत. सध्याची परिस्थितीत पाहता आदित्यला आपले लग्न थाटामाटात करायचे नाही आहे. माहितीनुसार लग्न झाल्यानंतर २ डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी आदित्य देणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityasiddharth_fancub

आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांनी सांगितले की, ‘त्यांनी आदित्यच्या लग्नाचे आमंत्रण अभिनेते आमिताभ बच्चन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.’ पण ते येणार की नाही याबाबतची माहिती समोर आलेली नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -