संपूर्ण देशासोबतच जगभराचे ज्या भव्य दिव्य लग्नाकडे लक्ष लागले होते ते मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचे अनंत अंबानीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा भव्य विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नसोहळ्यात भव्य दिव्य सजावट, भव्य दिव्य आयोजन या केले होते. भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकप्रिय कलाकार या लग्नात खास परफॉर्मन्स देऊन गेले. देशाच्या पंतप्रधानांसह ते जगभरातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्यात सुरांची जबाबदारी ही मराठमोळे गायक अजय-अतुल यांच्याकडे होती.
राधिका मोराच्या रथात बसून विवाह स्थळी दाखल झाली. हा मोराचा रथ पाण्यात तरंगत विवाह स्थळी पोहोचला. त्यात मराठमोळ्या अजय-अतुल यांच्या गाण्यावरच अंबानींच्या नव्या सुनेने लग्नमंडपात एन्ट्री घेतली. ही हटके एंट्री सगळ्यांनाच खूप आवडली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
त्याचप्रमाणे अजय-अतुलसोबत बरीच गायक मंडळी या सोहळ्यात दिसली. अजय-अतुलने अंबानींच्या सोहळ्यात देवा श्रीगणेशा हे गाणं गायलं. अजय अतुल सोबत त्या वेळी श्रेया घोषाल, शंकर महादेवन, सोनू निगम यांसारखे मोठे गायक सुद्धा सुमधुर गाणं गाताना पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न साधारण वर्षभर चर्चेत होते. त्यांच्या लग्नानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. दोनदा प्री-वेडिंग फंक्शन, साखरपुडा, मग लग्नाआधीचे कार्यक्रम आणि लग्न असा बराच मोठा कार्यक्रम अंबानींनी आपल्या लेकासाठी आयोजित केला होता. मुकेश अंबानी हे केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या घरचा विवाह सोहळा हा देखील तसाच दिमाखात पार पडला.
Edited By : Nikita Shinde