Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गायक अनु मलिकच्या आईचे निधन, शेवटच्या क्षणापर्यंत नातू होता सोबत

गायक अनु मलिकच्या आईचे निधन, शेवटच्या क्षणापर्यंत नातू होता सोबत

अल्लाह माझा देवदूत आता तुझ्यासोबत आहे', अशी भावूक पोस्ट लिहित अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्या आईचे निधन झाले. (Singer Anu malik mother Bilquis Malik passes away)  बिलकिस मलिक ( Bilquis Malik) असे त्यांच्या आईचे नाव होते. २५ जुलै रोजी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गुरुवारी त्यांना अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्याने मुबंईच्या आरोग्य निधी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.  सांताक्रूझच्या कब्रस्तानात त्यांचा दफन विधी पार पडला. अनु मलिक यांच्या भाचा आणि गायक अरमान मलिक (Arman Malik) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ही दुख: बातमी दिली. या पोस्टमधून अरबाज आणि त्याच्या आजीचे फार घट्ट नाते असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनु मलिक यांच्या आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत नातू अरमान मलिक त्यांच्या सोबत होता. रुग्णालयात दाखल केल्यापासून तो आपल्या आजीची सेवा करत होता.

- Advertisement -

आजीच्या जाण्याने अरमान मलिक फारच दु:खी झाला असून आजीच्या आठवणींना उजाळा देत आजीसोबतचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. आजीच्या आठवणीत अरमानने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘आज मी माझी सर्वात चांगली मैत्रिण गमावली…माझी आजी. माझ्या आयुष्याचा प्रकाश. हे नुकसान मी कधीच भरुन काढू शकत नाही. मला माहित आहे माझ्या आयुष्यातील ही पोकळी कोणीही भरू शकत नाही. आजी तु माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आणि मौल्यवान व्यक्ती होतीस. तुझ्यासोबत मी इतका वेळा घालवू शकलो याबद्दल मी नेहमी आभारी आहे. अल्लाह माझा देवदूत आता तुझ्यासोबत आहे’, अशी भावूक पोस्ट लिहित अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARMAAN MALIK 🧿 (@armaanmalik)

- Advertisement -

अमाल मलिक याने देखील आजीच्या अंतिम संस्कारानंतर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्यात. त्याने असे लिहिलेय, ‘आज तुझी दफनविधी करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काम होते. मी शेवटची गळा भेट करण्यासाठी रडत होतो पण तु त्याआधीच गेली होतीस. आजोबांच्या बाजूला तुझा दफनविधी व्हावा अशी तुझी इच्छा होती आणि मला आनंद आहे आम्ही असं करु शकलो. जसा मी तिथून निघालो तसा पाऊस सुरु झाला. मी आकाशाच्या दिशेने पाहताना मला कळाले की तुला जिथे जायचे आहे तिथे गेलीस आजोबांकडे. आजी रविवारी सकाळच्या नाश्तासाठी आलू पराठे आणि रात्रीच्या जेवणासाठी पिझ्झा पार्टी होती. तु नेहमी आमच्यात असशील’ असे अमालने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amaal Mallik (@amaal_mallik)


हेही वाचा – घाबरायचं नायं! ‘ती परत आलीये’ मालिकेचा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisement -