घरताज्या घडामोडी'हा' घ्या करोनापासून बचाव करण्यासाठी खास ड्रेस!

‘हा’ घ्या करोनापासून बचाव करण्यासाठी खास ड्रेस!

Subscribe

या पोशाखाला ‘हॅजमत सूट’ असं म्हणतात

करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. चीनमध्ये असलेला हा व्हायरस कालांतराने जगभर पसरला. जवळजवळ ९२ देशात करोनाची लागण झाली आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. यासाठी प्रसिद्ध गायक एरिका बाडू हीने एक अनोखी शक्कल लढवली आहे.

View this post on Instagram

Social Distancing Couture by E.Badu Bootleg Hazmet .

A post shared by THE UNICORN (@erykahbadu) on

- Advertisement -

एरिकाने करोनापासून सुरक्षीत राहण्यासाठी एक खास पोशाख तयार करून घेतला आहे. या पोशाखाला ‘हॅजमत सूट’ असं म्हणतात. लुईस विटन नामक कंपनीने या सूटची निर्मिती केली आहे. हा सूट अतिशय महाग आहे. एरिका बाडूने ‘हॅजमत सूट’ घालून काढलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

एरिकाने तो महागडा सूट घालून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. एरिका बाडू ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायीका आहे. तिने ‘वॉट मॅन वॉट’, ‘हाऊस ऑफ डी’, ‘द लँड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -