HomeमनोरंजनArmaan Malik : प्रसिद्ध गायकाने गुपचूप उरकलं लग्न, फोटो केले शेअर

Armaan Malik : प्रसिद्ध गायकाने गुपचूप उरकलं लग्न, फोटो केले शेअर

Subscribe

नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.  त्याने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांची गुपचूप लग्न उरकले असून चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांच्या चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज होते. अरमानने त्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत असून अरमान आणि आशनावर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.

‘मैं रहूँ या ना रहूँ’, ‘जेहर’, ‘बोल दो ना जरा’, ‘पहेला प्यार’, ‘मुझको बरसात बना लो’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचा गायक अरमान मलिकने आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केली आहे. अरमानने त्याची गर्लफ्रेंड आता पती-पत्नी झाले आहेत. अरमानने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो पोस्ट केले आहेत. ‘तू है मेरा घर’ असं कॅप्शन अरमानने या फोटोंना दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARMAAN MALIK (@armaanmalik)

 अरमान व आशना यांच्या लग्नातील लूकची खूप चर्चा होत आहे. आशना केशरी रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे, तर अरमानने फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.

अरमानची पत्नी आशनाबद्दल बोलायचे झाल्यास ती ग्लॅमरविश्वात सक्रिय आहे. आशना एक लोकप्रिय यूट्यूबर आहे, ती फॅशन आणि ब्यूटी व्लॉग बनवते. अरमान मलिकपेक्षा आशना वयाने मोठी आहे. अरमान 29 वर्षांचा असून आशना 31 वर्षांची आहे.