जर्मनीतील गायिकेलाही ‘कांतारा’ची भुरळ; ‘वराह रुपम’ गाणं गात व्हिडीओ केला शेअर

टॉलिवूड अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही हा चित्रपट अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. या चित्रपटाला फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांनी पसंती दिली. दरम्यान, आता या चित्रपटाची भुरळ परदेशातील कलाकारांना सुद्धा पडल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच एका जर्मनीतील कलाकाराने ऋषभ शेट्टीच्या चित्रपटातील ‘वराह रुपम’ गाणं गायलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जर्मनीतील गायिकेला कांताराची भुरळ

 

View this post on Instagram

 

A post shared by CassMae (@cassmaeofficial)

जर्मनीतील गायिका Cassmae ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कांतारा चित्रपटातील ‘वराह रुपम’ गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ आता अभिनेता ऋषभ शेट्टीने देखील पाहिला असून तो ट्टीटरवर रिट्वीट
देखील केला आहे.

‘कांतारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवल्यानंतर आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याआधी 4 नोव्हेंबर रोजी ओटीटी वर चित्रपट प्रदर्शित होईल असं म्हटलं जात होतं. परंतु त्यानंतर याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 24 नोव्हेंबर पासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

काय आहे ‘कांतारा’ची कथा?
‘कांतारा’ चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि चित्तथरारक आहे. यामध्ये 1870 मधील काळ दाखवण्यात आला आहे.

 


हेही वाचा :

विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती