Kanika Kapoor Wedding : ‘बेबी डॉल’ कनिका कपूर आज चढणार बोहल्यावर; मेहंदी सेरेमनीपासून ते सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

singer kanika kapoor Wedding mehndi ceremony photos viral wedding day haldi photos
Kanika Kapoor Wedding : 'बेबी डॉल' कनिका कपूर आज चढणार बोहल्यावर; मेहंदी सेरेमनीपासून ते सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये बेबी डॉल या गाण्याने करोडो प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गायक कनिका कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कनिका कपूर 20 मे रोजी म्हणजे आज तिचा पती गौतमसोबत लग्न करणार आहे. कनिका कपूरचं हे दुसरं लग्न आहे. नुकतेच कनिकाच्या प्री- वेडिंग सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच तिच्या हळदीपासून ते मेहंदी सेरेमनीचे फोटोही तुफान व्हायरल होत आहेत.

Kanika Kapoor Gautam wedding
Kanika Kapoor Gautam wedding

नुकतेच कनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर करल लिहिले की, जी आय लव्ह यू सो मच. कनिकाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्याकडून तिला आयुष्यातील नव्या पर्वासाठी अनेक शुभेच्छा दिल्या जात आहे.

Kanika Kapoor wedding
Kanika Kapoor wedding

कनिका कपूरच्या मेहंदी सेरेमनीतील फोटोंमध्ये इतकी सुंदर आहेत की तुम्ही सहजासहजी त्यांची नजर हटवू शकणार नाही. सिंगरचे चाहते तिच्या या फोटोंवर सातत्याने कमेंट्स करत आहेत.

Kanika Kapoor wedding
Kanika Kapoor wedding

तसेच सेलिब्रिटींकडूनही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. कनिका आणि गौतम यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन प्रपोज केले. यादरम्यान दोघांचा आनंद पाहण्यासारखा होता. कनिका आणि गौतम एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवलेले दिसत होते.

Kanika Kapoor wedding
Kanika Kapoor wedding

मेहंदी सेरेमनीला कनिकाने हलक्या हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात कनिका बेबी डॉलसारखी दिसत होती. त्याच वेळी तिच्या भावीने गौतमने क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता.

Kanika Kapoor wedding
Kanika Kapoor wedding

मेहंदी सेरेमनीसह हळदी सेरमनीतही कनिका आणि गौतमने धमाकेदार डान्स केला आणि मजा केली. कनिका कपूरचा भावी पती गौतम हा एनआरआय उद्योगपती आहे. लग्नाचे सर्व विधी लंडनमध्येच होत आहेत. कनिका कपूरचे यापूर्वी एनआरआय उद्योगपती राज चंडोकसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनी कनिका आणि राज वेगळे झाले. कनिकाला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.


Adani Group ची आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; ही या सरकारी कंपनीला घेणार विकत