घरमनोरंजनगायक महेश काळे आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायले '...

गायक महेश काळे आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायले ‘ ऐक्य मंत्र’ गाणे

Subscribe

शास्त्रीय संगीतावर आधारित एकात्मतेच्या गायनातून 'ग्लोबल इंडीयन्स’ची मातृभूमीला मानवंदना

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक महेश काळे आणि जगभरातील अनिवासी भारतीयांच्या मुलांनी ‘ऐक्य मंत्र’ या शास्त्रीय संगीतावर आधारीत एकात्मतेचे गाणे म्हणत, मातृभूमी भारत आणि भारतीय संस्कृती यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हे गाणे सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे नागरिकांनीही या गाण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून,पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख लोकांनी विविध सोशल मीडिया प्लॅटॉर्मवर हे गाणे पाहिले आहे. शास्त्रीय गायनाचा झेंडा अटकेपार फडकवत संगीत कलेवर निस्सीम प्रेम असणारा तरुण गायक म्हणजे महेश काळे. महेश काळेने(mahesh kale) त्याच्या शास्त्रीय संगीताने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. महेश काळेला त्याच्या गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. गायक महेश काळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सक्रिय असतो. महेश काळे सूर नवा ध्यास नवा(sur nava dhyas nava) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे.

हे ही वाचा – ‘त्याने आमचा पाठलाग केला नंतर १- २ तास चांगली कंपनी दिली’ गायक महेश काळेने सांगितला ‘तो’ अनुभव

- Advertisement -
Mahesh Kale
महेश काळे

या नवीन गाण्याबाबत गायक महेश काळे म्हणाले,” इंडियन क्लासिकल म्युझिक अंड आर्ट फौंडेशन (आयसीएमए) या सॅन फ्रान्सिस्को स्थित स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने आम्ही हे गीत सादर करत आहोत. ‘अनेकता मे ऐक्य मंत्र ‘ असे हे गीत असून, विविधतेत ऐकता, असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. हे गाणे सारंग, शंकरा-हंसध्वनी, केदार आणि भैरवी या चार रागांवर आधारित आहे. गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, कर्जतजवळील या गावातील काही ठिकाणे तसेच अमेरिकेतील स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सिडनीतील ओपेरा हाउस यासारख्या ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी करण्यात आले असून, विविधतेत एकता असल्याचे या गाण्यातून दर्शविण्यात आले आहे.”

हे ही वाचा – ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ‘गुंजन’ आणि ‘मधुमालती’ या म्युझिक अल्बमचे लोकार्पण

- Advertisement -

या गाण्याचे विशेष म्हणजे यामध्ये अमेरिका, दक्षिणा अमेरिका, कॅनडा, मध्य आशियाई देश अशा विविध देशांमधील ८ ते १५ वर्षे वयोगटातील ५० हून अधिक अनिवासी भारतीय मुले अर्थात ‘ग्लोबल इंडियन्स’ सहभागी झाली आहेत. परदेशात जन्मलेले आणि तिथेच वाढले असले, तरी आपल्या भारतीय पालकांमुळे भारत देशासोबत, येथील संस्कार आणि संस्कृती यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनिवासी भारतीय मुलांनी या गाण्याच्या माध्यमातून आपली मातृभूमी आणि भारतीय संस्कृती यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला सहभाग नोंदविला आहे.

हे ही वाचा – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

अनिवासी भारतीयांना आपल्या देशाप्रती प्रचंड आदर आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो ते व्यक्तही करतात. मात्र हे उपक्रम परदेशात होत असल्याने, अनेकदा भारतातील लोकांना याबाबत फारशी माहिती नसते. या गाण्याच्या माध्यमातून निवासी आणि अनिवासी भारतीय यांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही महेश काळे यांनी सांगितले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -