Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन गायिका नीति मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म,सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

गायिका नीति मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म,सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

निहार आणि नीतिने 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा दोघेही आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात.

Related Story

- Advertisement -

आपल्या गोड आवाजाने लोकांना थिरकायला लावणारी गायिका नीति मोहनच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. नीतिने 2 जून रोजी एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे. पति निहार पांड्याने सोशल मीडिया अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली आहे. त्याने नीति आणि स्वत:चा एक छानसा फोटो शेअर करत लिहले आहे की,”माझ्या सुंदर पत्नीने माझ्या वडिलांनी मला शिकवलेल्या सर्व गोष्टी आमच्या लहान मुलास शिकवण्याची संधी दिली आहे.ती दररोज माझ्या आयुष्यात अधिकाधिक प्रेम फुलवत आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नीती आणि आमचा बाळ दोघेही सुरक्षित आणि स्वस्थ आहेत.आज मुंबईत ढगाळ / पावसाचे वातावरण आहे. आणि या दिवशी आमच्या घरी ‘SON-Rise’ झाले. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादासाथी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत धन्यवाद करतो. ”
निहारने अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nihaar Pandya (@nihaarpandya)

- Advertisement -

निहार आणि नीतिने 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा दोघेही आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. नीति गरोदर असल्याची बातमी सुद्धा त्यांनी पोस्ट केली होती . आणि लिहले होते की,”मी गर्भधारणेचा हा प्रवास किती सुंदर आहे हे शब्दात सांगू शकत नाही. हे चमत्कार आहे की एक आयुष्य स्वतःमध्ये वाढत आहे”नीति आणि निहार वर सध्या सोशल मीडिया तर्फे फॅन आणि अनेक कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


हे हि वाचा –  दिशा-टायगरवर मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल,विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात

- Advertisement -