गायिका शाल्मली खोलगडे बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात

शाल्मली आणि फरहान यांनी चक्क आर्टिफिशिअल फुलांचे हार घातले आहेत. त्या हारात दोघांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत.

Singer Shalmali Kholgade got married to boyfriend Farhan Shaikh
गायिका शाल्मली खोलगडे बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात

बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाने सर्वांना घायाळ करणारी मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade ) नुकतील लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड फरहान शेख सोबत शाल्मनीने लग्न केलं. घरच्या घरीच २२ नोव्हेंबर रोजी शाल्मली आणि फरहान यांचा छोटे खानी विवाहसोहळा पार पडला. कुटुंबातील काही सदस्य आणि मित्र मैत्रिणी लग्नाला उपस्थित होते. शाल्मलीने दोघांचे लग्नातील काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. शाल्मीच्या लग्नाची बातमी ऐकून तिचे चाहते फार खुश झालेत. शाल्मलीच्या पोस्टवर तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. शाल्मली आज १ डिसेंबरला लग्नाचे रिसेप्शन देणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

शाल्मलीने कायदेशीर पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर हिंदी पद्धतीने देखील सात फेरे घेत लग्न विधी पार पडले. शाल्मलीने शेअर केलेल्या फोटोखाली तिने कॅप्शन देत वडिलांनी घरच्या घरीच लज्जा होम आणि सप्तपदी चक्क इंग्रजी भाषेत भाषांतर करुन आयोजित केलं होतं. शाल्मलीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती लज्जा होम करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

तर शाल्मीने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तर तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शाल्मली आणि फरहान यांनी चक्क आर्टिफिशिअल फुलांचे हार घातले आहेत. त्या हारात दोघांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. शाल्मलीने केलेला हा अनोखा प्रयोग नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

शाल्मली ही नेहमीच ग्लमरस आणि हॉट अंदाजात प्रेक्षकांना दिसत असते. लग्नातही शाल्मली तशीच दिसली. कोणताही ताम झाम न करता शाल्मली लग्नात फार सिंपल पण सुंदर लुकमध्ये दिसली. शाल्मलीने लग्नात ऑरेंज कलरची साडी आणि त्यावर नेक नॉटवाला स्टायलीश ब्लॉउज घातला आहे आणि साधी हेअरस्टाइल करुन केसात गरजा माळला आहे. शाल्मलीच्या गाण्यांप्रमाणेच शाल्मलीचे छोटेखानी लग्न देखील सुपरहिट ठरलं आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? ४ डिसेंबरला रंगणार सुवर्णदशक सोहळा