घरमनोरंजन'ही' आघाडीची गायिका लवकरच चित्रपटात?

‘ही’ आघाडीची गायिका लवकरच चित्रपटात?

Subscribe

बॉलीवूडमध्ये आपल्या आवाजाने सर्वांना घायाळ करणारी ही गायिका, आता लवकरच चित्रपटात डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

जगभरात तिच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूड चित्रपटांमधून गाणी गाऊन आजवर तिने प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन केलं आहे. आपल्या आवाजाने तमाम चाहत्यांना घायाळ करणारी ही गायिका आहे नेहा कक्कर. बॉलीवूडच्या आघाडीच्या गायिकांपैकी एक असलेल्या नेहा कक्करने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू चालवली आहे. आपल्या खास उडत्या शैलीतल्या गाण्यांनी नेहाने प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन केले आहे. मात्र, आता लवकरच ही सुरों की मलिका बॉलीवूड सिनेमात काम करणार असल्याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. इंडियन आयडलच्या आगामी  सिझनमध्ये जज बनलेल्या नेहाने याआधीच आपल्या चाहत्यांना खुशखबरी दिली होती. अशातच आता ती सिनेमामध्ये येणार असल्याच्या चर्चेमुवळे तिचे चाहते नक्कीच खुश झाले असणार.

नेहाचा दुसरा सिनेमा?

याआधीही नेहा कक्करने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छोटीशी झलक दाखवली आहे. 2010 साली आलेल्या ‘ये ऐसी लाईफ है’ या सिनेमामध्ये नेहाने एक छोटीशी भूमिका साकरली होती. त्यामुळे नेहाला ऑफर करण्यात आलेला नवा सिनेमा तिचा दुसरा सिनेमा असेल. नेहा परीक्षक असलेल्या इंडियन आयडल सीझन १० चे सध्या शूटींग सुरु आहे. याच शूटदरम्यान नेहाला पुन्हा एकदा सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सिनेमात काम करण्याविषयी IANS शी बोलताना नेहा म्हणते, की ”मुळात मी एक गायिका असून गाणं हे माझं विश्व आहे. संगीत  क्षेत्रात काम करायला माझं कायमच प्राधान्य राहील. मात्र, जर एखादी चांगल्या आशयाची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तर नक्कीच मी त्याचा विचार करेन.” त्यामुळे आता नेहा आता खरंच सिनेमात काम करणार का? याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

- Advertisement -
Neha-Kakkar
बॉलीवूडची गायिका- नेहा कक्कर

सोशल मीडियावरही नेहाची ‘हवा’

नेहा कक्करचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली नेहा ही एकमेव भारतीय आर्टिस्ट आहे. नेहा स्वत: इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून नेहा तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याविषयीचे अपडेट्स, तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. ‘माझे चाहते माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. इतकंच नाही तर माझे चाहते हे माझी प्रेरणा अाहेत. मला नेहमीच चांगलं काम करण्यासाठी ते प्रेरित करत असतात’, असं नेहा सांगते. याआधी नेहाने तिचा कथित बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत एक सोलो व्हिडाओ केला होता. त्या दोघांच्या ‘हमसफर‘ या व्हिडीओ साँगला चक्क १० कोटींच्या वर व्ह्युज मिळाले होते.

Neha kakkar

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -