अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे . सिंघम अगेन मधून अभिनेता अजय बाजीराव सिंघमच्या भुमिकेतुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहे . सध्या अजय त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेता जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
विलेपार्ले येथे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम शूटिंग करत असताना अजयच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण एका कॉम्बॅट सीनचे शूटिंग करत असताना अनावधानाने अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आघात होऊन त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार अजयला दुखापत झाल्यावर त्याने काही वेळासाठी विश्रांती घेतली. त्यावेळी रोहितने खलनायकांचा समावेश असलेले इतर सीन शूट करून घेतले. मात्र काही वेळातच अजयने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली.
सिंघम अगेन’ची टीम आता फिल्मसिटीमध्ये उरलेले सीन्स शूट करून घेणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंघम अगेन मध्ये अनेक महत्वकांक्षी टीम जोडली आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात झळकणार आहेत. तर रणवीर सिंग आणि अक्षय कुमार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
- Advertisement -