घरताज्या घडामोडीरोहित शेट्टी आणि अजय देवगणचा Singham 3 चित्रपट Article 370वर आधारित; कॉन्सेप्टचा...

रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा Singham 3 चित्रपट Article 370वर आधारित; कॉन्सेप्टचा झाला खुलासा

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या यशस्वी कामगिरीनंतर आता ‘सिंघम ३’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक दिवशी ‘सिंघम ३’बाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. ‘सिंघम ३’ पोलिसांवर आधारित असलेला चित्रपट असल्याचे म्हटले जात होते. पण माध्यमाच्या वृत्तानुसार आता असे समोर आले आहे की, ‘सिंघम ३’ चित्रपटाचा कॉन्सेप्ट ऑर्टिकल ३७० वर आधारित असणार आहे. काश्मीरमधून आर्टिकल ३७० हटवण्याच्याबाबत हा चित्रपट तयार केला जाईल. दरम्यान अजूनपर्यंत याबाबत चित्रपट निर्मात्यांकडून याची अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे अजूनही ‘सिंघम ३’च्या कॉन्सेप्टबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.

माध्यमाच्या वृत्तानुसार, ‘आर्टिकल ३७०’वर सिंघम ३ चित्रपट आधारिक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. सध्या रोहित शेट्टी ‘सिंघम ३’च्या आयडियाजवर काम करत आहे. रोहितला असा एक विषय घ्यायचा आहे, ज्यावर अजूनपर्यंत काम झालेले नाही. काश्मीरमधून ‘आर्टिकल ३७०’ हटवण्याचा विषय आजही चर्चेत आहे आणि त्यामुळे हा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्सहित करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

- Advertisement -

पण काही माध्यमाच्या वृत्तानुसार ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील कथेची तार ‘सिंघम ३’ चित्रपटाला जोडला जाईल. चित्रपट सत्य घटनेवर तयार केला जाईल. ‘सिंघम ३’ चित्रपटाची कथा जिथून सुरू होईल, जिथे ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील कथा संपली होती.

दरम्यान ‘सिंघम ३’ शूटिंग अजय देवगण काश्मीरच्या रियल लोकेशनवर करण्याचा विचार करत आहे. चित्रपटाचा नायक खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याच्या विचारत आहे. म्हणजेच दोन वर्ष ‘सिंघम ३’ मोठ्या पडद्यावर येण्यासाठी लागतील. माहितीनुसार, ‘सिंघम ३’चे शूटिंग काश्मीर, दिल्ली आणि गोव्यात होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjeev kumar  : ‘या’ अटीमुळे हेमामालिनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -