पुन्हा एकदा बॉलिवूड मधील दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आगामी सिनेमा सिंघम अगेन याची शूटिंग सुरु झाली आहे. याबद्दल त्याने अधिकृत घोषणा केली आहे. सिंघम अगेन मध्ये बॉलिवूड कलाकार अजय देवगण याच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत. याच दरम्यान अक्षय कुमार याने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहिली आहे.
सिंघम अगेनचे शुटिंग सुरु
नुकत्याच सेटवर पूजा करताना फोटो अजय देवगण, रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह याने सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या फोटोत रणवीर सिंह, रोहित शेट्टी, अजय देवगण हात जोडून पूजा करताना दिसून येत आहेत. सिंघम हा अजय देवगण नसेल तर मजा नाही. त्यामुळेच चाहते त्याच्या या सिनेमाची वाट पाहत होते. अजय देवगणने सिंघम-3 ची घोषणा करत काही फोटोज शेअर केले आहेत.
View this post on Instagram
ही पोस्ट शेअर करत अजय देवगण याने कॅप्शन मध्ये लिहिले की, आम्ही 12 वर्षांपूर्वी भारतीय सिनेमाला सर्वाधिक मोठा सिनेमॅटिक कॉप युनिव्हर्सला दिला होता. ऐवढ्या वर्षात जे प्रेम मिळाले त्यामुळे सिंघमचा परिवार अधिक मजबूत आणि मोठा झाला आहे. आता पुन्हा एकदा आम्ही सिंघम अगेन सोबत आपली फ्रेंचाइजी घेऊन येण्यासाठी तयार आहोत. रिपोर्ट्सनुसार या सिनेमात अर्जुन कपूर विलनची भुमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.
अक्षय कुमारने खास मेसेज लिहित म्हटले की, सध्या मी भारतात नाही. व्यक्तिगत रुपात फ्रेममधून बाहेर असलो तरीही आत्म्याने मी पूर्णपणे तेथे आहे. सिंघम अगेनच्या सेटवर तुमच्या लोकांना भेटण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही. माझ्या शुभेच्छा पाठवत आहे. जय महाकाल.
हेही वाचा- शाहरूख खानचा जबरा फॅन; चित्रपटगृहात व्हेंटिलेटर नेत पाहिला जवान चित्रपट…