घरमनोरंजनस्मिताचा नवीन म्युझिक अल्बम! पाहा, फर्स्ट लूक

स्मिताचा नवीन म्युझिक अल्बम! पाहा, फर्स्ट लूक

Subscribe

'पप्पी दे पारुला' या सुपरहिट गाण्यानंतर आता स्मिता गोंदकरचा, 'लाजरान साजरा' हा नवीन म्युझिक अल्बम लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस मराठी या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री स्मिता गोंदकर घराघरात पोहचली. ‘पप्पी दे पप्पी दे पारुला’ या गाण्यातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेल्या स्मिता गोंदकरला बिग बॉसच्या माध्यमातून तूफान लोकप्रियता मिळाली. आज देशभरातील हजारो लोक तिचे चाहते बनले आहेत. तिच्या याच चाहत्यांसाठी आता एक नवीन खुशखबर आहे. बिग बॉस मराठी या शोनंतर स्मिताचं पुढील प्रोजेक्ट काय असणार, तिचा सिनेमा येणार की एखादी मालिका? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते. मात्र, आता अखेर या गोष्टीचा खुलासा झाला आहे. स्मिताचा नवीन म्युझिक अल्बम येत असून ‘लाजरान साजरा’ असं या म्युझिक अल्बमचं नाव आहे. नुकताच ‘लाजरान साजरा’चा फर्स्टलूक रिलीज झाला असून यानिमित्ताने पुन्हा एकदा स्मिता चर्चेत आली आहे. स्मिता गोंदकरने स्वत: तिच्या फेसबुक अकाउंटवरुन हे ‘लाजरान साजरा’चं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केलं आहे. या बातमीमुळे स्मिताच्या चाहत्यांना आनंद झाला असणार यात काही शंकाच नाही.

smita gondkar new album
सौजन्य- स्मिता गोंदकर/फेसबुक
स्मिता गोंदकरला व्हिडिओ पॅलेस या म्युझिक कंपनीकडून या नवीन गाण्याची ऑफर मिळाल्याचं समजतं आहे. बिग बॉसच्या माध्यमातून भन्नाट लोकप्रियता मिळवलेल्या स्मिताच्या या नव्या गाण्याचं लोक कशाप्रकारे स्वागत करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्पी दे पारूला.. प्रमाणेच आता ‘लाजरान साजरा’ला देखील लोक पसंती देणार का हे लवकरच कळेल. दरम्यान सध्या तरी ‘लाजरान साजरा’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

‘बिग बॉस’ विषयी स्मिता म्हणते…

‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास अविस्मरणीय होता. या घराने मला खूप काही दिलं. छान छान आठवणी दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील सगळ्या सदस्यामुळे माझी भाषा सुधारली. सुरुवातीला मराठी चांगलं येत नसल्यामुळे अनेक गैरसमज झाले. कोणी काही बोललं तर मला लगेच अर्थ कळायचा नाही. मग गैरसमज वाढायचे. पण आता मला नीट मराठी समजतंही आणि बोलताही येतं. या सगळ्याचं क्रेडिट मी उषा नाडकर्णी यांना देते. ‘बिग बॉस’च्या घरात शंभर दिवस राहणं हा माझा करियरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -