Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन स्मिता गोंदकरचा नवा म्युझिक व्हिडिओ 'साजणी तू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

स्मिता गोंदकरचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘साजणी तू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा' अशी उत्तम रचना असलेल्या म्युझिक व्हिडिओचे संगीत आणि दिग्दर्शन आदित्य बर्वेनं केले आहे.

Related Story

- Advertisement -

‘पप्पी दे पारुला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर लवकरच एका नव्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. साजणी तू असे या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे. ‘साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा’ अशी उत्तम रचना असलेल्या म्युझिक व्हिडिओचे संगीत आणि दिग्दर्शन आदित्य बर्वेनं केले आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्युबचॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होणार आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं या गाण्याचे गायन ऋषिकेश रानडे यांनी केले आहे. तसेच अशोक पवार या म्युझिस व्हिडिओचे छायालेखक आहेत. सप्तसूर म्युझिक प्रस्तुत “साजणी तू….” या म्युझिक व्हिडिओची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘साजणी तू’द्वारे एक फ्रेश म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

अभिनेत्री स्मिता गोंदकरने आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडिओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता ‘साजणी तू’ सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवणार यात शंकाच नाही.


- Advertisement -

हे वाचा-  प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या भावाच्या निघृण हत्येप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

- Advertisement -