घरमनोरंजन'पंगा'मध्ये कंगनासोबत दिसणार ही मराठी अभिनेत्री

‘पंगा’मध्ये कंगनासोबत दिसणार ही मराठी अभिनेत्री

Subscribe

अनेक चित्रपटातून स्मिता तांबेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. जोगवा, ७२-मैल, परतु, देऊळ यासारख्या विविध मराठी चित्रपटातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने भुरळ पाडली. मराठी चित्रपटासह स्मिताने नूर, सिंघम २, रूख सारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. लवकरच कंगनाच्या पंगामध्ये स्मिता तांबे ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार आहे.

- Advertisement -

पंगा या हिंदी चित्रपटात कंगणा राणौत कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार असून संपुर्ण चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहे. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात कंगना कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

‘सावट’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्मिताने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले असून स्मिता तांबे स्केक्रेट गेम्स २नंतर पुन्हा एकदा हवा बदले हसू’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -