Smriti Iraniचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स हैराण, पहा फोटो

स्मृर्ती इराणी यांनी केलेल्या वेल लॉस ट्रान्सफॉर्मेशनपाहून सर्वाच चकीत होऊन त्यांच्याकडे वेट लॉसच्या टिप्स मागताना दिसत आहेत.

Smriti Irani has shared her weight loss photos on social media
Smriti Iraniचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स हैराण, पहा फोटो

केंद्रीय मंत्री स्मृर्ती इराणी सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. त्यांच्या अनेक खाजगी गोष्टी देखील त्या शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा अनोखा अंदाजातला एक फोटो पोस्ट केलाय. जो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहे. आपण पाहिले तर गेल्या अनेक दिवसांपासून स्मृर्ती इराणी या त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. अनेक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर होत्या. स्मृर्ती इराणी यांनी केलेल्या वेल लॉस ट्रान्सफॉर्मेशनपाहून सर्वाच चकीत होऊन त्यांच्याकडे वेट लॉसच्या टिप्स मागताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

स्मृर्ती यांनी इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय ज्यात त्या साडी नेसून साइड पोज देताना दिसत आहेत. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना त्यांच्या वेट लॉसविषयी प्रश्न केले. त्याचप्रमाणे स्मृर्ती यांनी त्यांचे इतर फोटो देखील शेअर केले त्यातही त्यांच्यात झालेले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले आहे. झाडाखाली उभ्या राहून स्मृर्ती फुले तोडत असताचा त्यांचा फोटो चाहत्यांना फारच आवडला आहे.  फुले तोडू नका असे म्हणत त्यांना हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

स्मृर्ती इराणींच्या या पोस्टवर ६५ हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. मौनी रॉय यांनी देखील ‘खुप सुंदर’ असे म्हणत कौतुक केले आहे. सोमन कपूर, दिव्या सेठ,रुचिका कपूर अशा अनेक अभिनेत्रींनी स्मृर्ती यांचे कौतुक केले आहे.

काही महिन्यांपूर्वी स्मृर्ती यांनी त्यांचा एक सेल्फी फोटो शेअर केला होत ज्यात त्या वेट लॉस करत असल्याचे दिसत होते. त्यांच्या या फोटोवर निर्माती एकता कपूने देखील कमेंट करत ‘थीन’ असे म्हटले होते त्यावर स्मृर्ती यांनी तिला एका इमोजीमध्ये उत्तर दिले होते. एकता कपूर आणि स्मृर्ती इराणी फार चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. स्मृर्ती इराणी या मालिकेतून घराघरात पोहचल्या होत्या.


हेही वाचा – नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही, कोर्टाचा निकाल