घरमनोरंजनराजस्थानातील 500 वर्षे जुन्या वाड्यात पार पडलं स्मृती इराणींच्या लेकीचं लग्न

राजस्थानातील 500 वर्षे जुन्या वाड्यात पार पडलं स्मृती इराणींच्या लेकीचं लग्न

Subscribe

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची मुलगी शैनेल ईराणी गुरुवारी अर्जुन भल्लासोबत विवाह बंधनात अडकली. यांचा विवाह देखील सिद्धार्थ आणि कियाराच्या विवाहाप्रमाणेच राजस्थानातील एका मोठ्या महालात पार पडला.7 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नाच्या इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. हळद, मेहंदी आणि संगीत हे कार्यक्रम पार पडले.

 Smriti Irani Daughter Wedding: बेटी की शादी में थिरकीं स्मृति ईरानी, आप भी देखें तस्वीरें

- Advertisement -

कुटुंबीय जवळचे नातेवाईक, मित्रांच्या उपस्थितीत पार पडलं लग्न


शैनेल ईरानीचा विवाह गुरुवारी जोधपुरच्या नागौर जिल्ह्यातमधील 16 व्या शतकातील खिमसर किल्ल्यामध्ये झाला. ज्यात त्यांचे कुटुंबीय जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात बुधवारपासून सुरु झाली होती. बुधवारी मेहंदी आणि हळद झाल्यानंतर रात्री संगीत पार पडलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

राजस्थानी संस्कृती होती लग्नाची थीम


स्मृती ईराणींच्या लेकीच्या लग्नाची थीम राजस्थानी संस्कृतीवर आधारित होती. त्यामुळे त्यांच्या लग्नातील सर्व विधी, राजस्थानी पद्धतीने पार पडल्या. शिवाय लग्नातील मेजवानी देखील राजस्थानी पद्धतीचे होते. तसेच सर्वांचे पोषाख देखील राजस्थानी होते. लग्नात शैनेल ईरानीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता तर तिच्या पतीने व्हाईट शेरवानी परिधान केला होता.

 


हेही वाचा :

रणबीर-आलियाला मागे टाकत सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी बनवला रेकॉर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -