पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात गर्दीत अडकलेल्या गायिका आशा भोसलेंची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुखरूप सुटका केली. आशा भोसले यांनी स्मृती इराणींचे याबद्दल आभार मानले आहेत. स्मृती इराणींचे आभार मानणारे ट्विट आशा भोसलेंनी केली आहे. स्मृती इराणी यांना महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात तब्बल ५५ हजार १२० मतांनी पराभव केला.
काय म्हणाल्या आशा भोसले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर एकच गर्दी उसळली. त्या गर्दीत मी अडकले. यावेळी कोणीही माझ्या मदतीसाठी आले नाही. तेव्हा स्मृती इराणी माझ्या मदतीसाठी धावून आल्या. मी घरी सुखरूप पोहचेन याची त्यांनी खात्री बाळगली. त्यांना काळजी आहे, म्हणून त्या जिंकल्या.
I was stranded in the crazy rush post PM oath ceremony. No one offered to help me except @smritiirani who saw my plight & made sure I reached home safely. She cares & that’s why she won. pic.twitter.com/vDV84PrIVp
— ashabhosle (@ashabhosle) May 30, 2019
पंतप्रधानांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला जगभरातील महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनाही हजेरी लावली. यामध्ये रजनीकांत, शाहीद कपूर, करण जोहर, कंगणा राणावत, विवेक ऑबेरॉय, अनुपम खेर, बोनी कपूर, कपिल शर्मा आदी उपस्थित होते.